नवी दिल्ली: दिल्लीच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरुन गौतम गंभीरची उचलबांगडी करण्यात आली आहे. गंभीरऐवजी 19 वर्षांचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजय हजारे करंडकाच्या आंतरविभागीय स्पर्धेला पात्र ठरणं दिल्लीच्या दृष्टीनं यंदा खूपच कठीण ठरलं होतं. त्यामुळंच गौतम गंभीरच्या कर्णधारपदावर निवड समितीची कुऱ्हाड पडली असावी असा अंदाज आहे. पण दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी एकाही सीनियर खेळाडूची तयारी नव्हती. त्यामुळं निवड समितीनं रिषभ पंतच्या खांद्यावर ती जबाबदारी सोपवल्याची सूत्रांची माहिती आहे. संबंधित बातम्या VIDEO : अर्धशतकानंतर जाडेजाची 'तलवारबाजी' ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित