एक्स्प्लोर

फिफा वर्ल्ड कपदरम्यान धक्कादायक घटना; फुटबॉलपटूला गोळ्या झाडून संपवलं; 5 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Palestinian Goalkeeper Saleem Al-Ashqar Shot in Gaza : सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2026 दरम्यान क्रीडा जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे.

Palestinian Goalkeeper Saleem Al-Ashqar Shot in Gaza : सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) दरम्यान क्रीडा जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनचा 32 वर्षीय फुटबॉलपटू सलीम खादर अल-अश्कर (Saleem Khader Al-Ashqar) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या (IDF) गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. 

अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते आणि त्याची पत्नी सध्या गरोदर आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने (PFA) सलीम खादर अल-अश्करच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलीम हा खान युनिस सर्व्हिसेस क्लबसाठी गोलकीपर म्हणून खेळायचा. या बातमीमुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सलीम खादर अल-अश्कर हा सात बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अकाली जाण्याने त्याची पत्नी आणि बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या पहिल्या बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच सलीमने या जगाचा निरोप घेतला.

पॅलेस्टाईनमध्ये खेळाडूंचे मोठे नुकसान

पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्ष आणि युद्धाचा तेथील क्रीडा जगताला मोठा फटका बसला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या संघर्षामध्ये आतापर्यंत 1,009 ॲथलीट्सनी (खेळाडूंनी) आपला जीव गमावला आहे. यामध्ये 567 फुटबॉलपटू, प्रशिक्षक (Coaches) आणि रेफ्रींचा समावेश आहे. ही आकडेवारी दर्शवते की, चालू असलेल्या संघर्षामुळे पॅलेस्टाईनच्या क्रीडा क्षेत्राचे किती अतोनात नुकसान झाले आहे.

फिफा वर्ल्ड कप 2026 बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी 

पॅलेस्टाईनचा संघ आशियाई पात्रता फेरीत (Asian Qualifiers) पुढे जाऊ शकला नाही, त्यामुळे ते या विश्वचषकाचा भाग नाहीत. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच 32 ऐवजी 48 संघ सहभागी झाले आहेत, ज्यांच्यामध्ये एकूण 104 सामने खेळवले जात आहेत. हा इतिहासिक विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जात आहे. यापूर्वी 2022 चा फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये आयोजित करण्यात आला होता.

हे ही वाचा -

IND vs ENG 2nd T20I Playing XI : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर 'या' खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget