मुंबई : फुटबॉल विश्वाचा सम्राट लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याच्या कडेवर खेळलेल्या एका लहान मुलाने आता फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) मध्ये आपला पहिला गोल करुन क्रीडा जगतात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. हे नाव म्हणजेच स्पेनचा तरुण स्टार फुटबॉलपटू लॅमिन यमाल (Lamine Yamal).

Continues below advertisement

सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये यमालने सौदी अरेबियाविरुद्ध आपला पहिला वर्ल्ड कप गोल नोंदवला. या ऐतिहासिक गोलनंतर मेस्सी आणि यमाल यांच्यात 17 वर्षांपूर्वी झालेली एक भेट आणि त्यांच्या पहिल्या वर्ल्ड कप गोलमधील कमालीचे योगायोग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लिओनेल मेस्सीने 2006 मध्ये आपला पहिला फिफा वर्ल्ड कप खेळला होता, तेव्हा तो अवघ्या 18 वर्षांचा एक उगवता तारा होता. 2007 ने मेस्सीने युनिसेफच्या (UNICEF) एका चॅरिटी कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात मेस्सीचे एका 6 महिन्यांच्या लहान बाळासोबत फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी मेस्सीने त्याला कडेवर घेऊन अंघोळ घालताना आणि खेळवतानाचे फोटो काढले होते.

Continues below advertisement

Lionel Messi Lamine Yamal Photo : 17 वर्षे गुप्त राहिलेला फोटो

आता ते सहा महिन्यांचं बाळ दुसरं तिसरं कुणी नसून लॅमिन यमाल असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो 17 वर्षे वर्षे जगासमोर आला नव्हता. 2024 मध्ये जेव्हा हा फोटो समोर आला, तेव्हा त्याला 'द बिगिनिंग ऑफ लिजेंड्स' (The Beginning of Legends) असे कॅप्शन देण्यात आले होते.

मेस्सी आणि यमाल यांच्यातील दोन मोठे योगायोग

2026 चा हा वर्ल्ड कप मेस्सीचा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे, तर लॅमिन यमालचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. यमालने सौदी अरेबियाविरुद्ध केलेल्या पहिल्या वर्ल्ड कप गोलमध्ये मेस्सीच्या पहिल्या गोलशी हुबेहूब जुळणारे 2 मोठे योगायोग दिसून आले:

वयाचा योगायोग (The Age Connection)

लिओनेल मेस्सीने जेव्हा आपला पहिला फिफा वर्ल्ड कप गोल केला होता, तेव्हा त्याचे वय 18 वर्षे 357 दिवस होते. तर लॅमिन यमालने आपला पहिला वर्ल्ड कप गोल केला तेव्हा त्याचे वय 18 वर्षे 343 दिवस आहे. म्हणजेच मेस्सीच्या तुलनेत यमालने अवघ्या 14 दिवस आधी हा पराक्रम करून दाखवला.

पायाचा योगायोग (The Right-Foot Wonder)

मेस्सी आणि यमाल हे दोघेही प्रामुख्याने आपल्या डाव्या पायाने (Left-footed players) फुटबॉल खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेस्सीने आपला पहिला वर्ल्ड कप गोल उजव्या पायाने (Right foot) केला होता. हुबेहूब त्याच पावलावर पाऊल ठेवत यमालनेही सौदी अरेबियाविरुद्धचा आपला पहिला वर्ल्ड कप गोल उजव्या पायानेच केला.

एकेकाळी बार्सिलोनाच्या अकादमीत खेळत लॅमिन यमालने स्पेनला 'युरो 2024' (EURO 2024) चे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता मेस्सीच्या शेवटच्या वर्ल्ड कपच्या काळात यमालने जागतिक फुटबॉलमध्ये आपल्या नव्या युगाची सुरुवात केल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.

ही बातमी वाचा: