FIFA World Cup 2026 Live Streaming Details : जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ म्हणजेच फुटबॉल! आणि या फुटबॉलचा महाकुंभ, अर्थात 'फिफा विश्वकरंडक' (FIFA World Cup) आता उद्यावर येऊन ठेपला आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही स्पर्धा शुक्रवारी पहाटेपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वकरंडक अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे, कारण आत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विश्वकरंडक असणार आहे.

स्पर्धेचे भव्य स्वरूप आणि यजमान देश

यावेळच्या विश्वकरंडकाचे आयोजन एका किंवा दोन नव्हे, तर तब्बल तीन देशांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत संयुक्तपणे केले जात आहे. एकूण 48 संघ असणार आहेत, याआधी फक्त 32 संघ असायचे. 16 वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या स्टेडियम्समध्ये तब्बल 140 सामने खेळवले जातील.

स्पर्धेचे नवीन स्वरूप (Format) कसा असेल? 32 संघ कसे निवडले जाणार?

  • संघांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धेच्या रचनेतही मोठा बदल करण्यात आला आहे.
  • गट रचना (Groups): 48 संघांची विभागणी एकूण 12 गटांत करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 संघ असतील.
  • साखळी फेरी: सुरुवातीला प्रत्येक संघ आपापल्या गटात 3 साखळी सामने खेळेल.
  • बाद फेरी (Knockout Stage): साखळी फेरीनंतर थेट 32 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
  • प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ (12 x 2 = 24 संघ).
  • सर्व गटांमधील तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम 8 संघ.

गुणतालिकेचे (Points Table) नियम

जर साखळी फेरीअंती दोन किंवा अधिक संघांचे गुण (Points) सारखे असतील, तर पुढील नियमांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. ज्या संघाचा गोल फरक चांगला असेल, त्याला प्राधान्य मिळेल. गोल फरकही सारखा असल्यास, त्या दोन संघांमधील सामन्याचा निकाल पाहिला जाईल. खेळात शिस्त राखणाऱ्या, म्हणजेच कमी कार्ड्स (पिवळे/लाल) मिळालेल्या संघाला पुढे संधी मिळेल. जर वरील सर्व गोष्टींमध्ये बरोबरी झाली, तर अखेर चिठ्ठी (ड्रॉ) टाकून निर्णय घेतला जाईल. साखळी फेरी संपल्यानंतर सुरू होणाऱ्या बाद फेरीत (Knockout) पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडेल.

भारतात कुठे आणि कसे पाहता येणार? (FIFA World Cup 2026 Live Streaming Details)

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेच्या भारतातील प्रसारणाचे हक्क झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेडने (ZEEL) मिळवले आहेत. टीव्हीवर 'युनाईट8 स्पोर्ट्स' (United8 Sports) या लिनियर टीव्ही चॅनेलवर सामने पाहाता येईल. 'झी5' (Zee5) या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्मवर असेल. 

फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील गट -

  • ए गट - मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, कोरिया, झेकिया
  • ब गट - कॅनडा, बोस्निया आणि हर्झेगोविना, कतार, स्वित्झर्लंड
  • सी गट - ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड
  • डी गट - अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, तुर्की
  • इ गट - जर्मनी, कुराकाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर
  • एफ गट - नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ट्युनिशिया
  • जी गट - बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड
  • एच गट - स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे
  • आय गट - फ्रान्स, सेनेगल, इराक, नॉर्वे
  • जे गट - अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन
  • के गट - पोर्तुगाल, डीआर काँगो, उझबेकिस्तान, कोलंबिया
  • एल गट - इंग्लंड, क्रोएशिया, घाणा, पनामा

फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे वेळापत्रक (FIFA World Cup 2026 Schedule Group Stage)

11 जून

  • मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका (गट अ), मेक्सिको सिटी स्टेडियम
  • कोरिया प्रजासत्ताक विरुद्ध झेकिया (गट अ) एस्टाडियो ग्वादालहारा

12 जून

  • कॅनडा विरुद्ध बोस्निया आणि हर्झेगोविना (गट ब), टोरोंटो स्टेडियम
  • अमेरिका विरुद्ध पॅराग्वे (गट ड), लॉस एंजेलिस स्टेडियम

13 जून

  • हैती विरुद्ध स्कॉटलंड (गट सी) बोस्टन स्टेडियम
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुर्किये (गट डी) बीसी प्लेस व्हँकुव्हर
  • ब्राझील विरुद्ध मोरोक्को (गट सी) न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम
  • कतार विरुद्ध स्वित्झर्लंड (गट बी) सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

14 जून

  • कोते डी'आयव्होर विरुद्ध इक्वेडोर (गट ई), फिलाडेल्फिया स्टेडियम
  • जर्मनी विरुद्ध कुराकाओ (गट ई), ह्यूस्टन स्टेडियम
  • नेदरलँड्स विरुद्ध जपान (गट एफ) डॅलस स्टेडियम
  • स्वीडन विरुद्ध ट्युनिशिया (गट एफ) एस्टाडियो मॉन्टेरी

15 जून

  • सौदी अरेबिया विरुद्ध उरुग्वे (गट एच), मियामी स्टेडियम
  • स्पेन विरुद्ध काबो वर्दे (गट एच), अटलांटा स्टेडियम
  • इराण विरुद्ध न्यूझीलंड (गट जी), लॉस एंजेलिस स्टेडियम
  • बेल्जियम विरुद्ध इजिप्त (गट जी), सिएटल स्टेडियम

16 जून

  • फ्रान्स विरुद्ध सेनेगल (गट आय), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम
  • बोलिव्हिया/इराक विरुद्ध नॉर्वे (गट आय), बोस्टन स्टेडियम
  • अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया (गट जे), कॅन्सस सिटी स्टेडियम
  • ऑस्ट्रिया विरुद्ध जॉर्डन (गट जे), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

17 जून

  • घाणा विरुद्ध पनामा (गट एल), टोरोंटो स्टेडियम
  • इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया (गट एल), डॅलस स्टेडियम
  • पोर्तुगाल विरुद्ध काँगो डीआर (गट के), ह्यूस्टन स्टेडियम
  • उझबेकिस्तान विरुद्ध कोलंबिया (गट के), मेक्सिको सिटी स्टेडियम

18 जून

  • झेकिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (गट अ), अटलांटा स्टेडियम
  • स्वित्झर्लंड विरुद्ध बोस्निया आणि हर्झेगोविना (गट ब), लॉस एंजेलिस स्टेडियम
  • कॅनडा विरुद्ध कतार (गट ब), बीसी प्लेस व्हँकुव्हर
  • मेक्सिको विरुद्ध कोरिया प्रजासत्ताक (गट अ), एस्टाडियो ग्वादालहारा

19 जून

  • ब्राझील विरुद्ध हैती (गट सी) फिलाडेल्फिया स्टेडियम
  • स्कॉटलंड विरुद्ध मोरोक्को (गट सी) बोस्टन स्टेडियम
  • तुर्किये विरुद्ध पॅराग्वे (गट डी), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम
  • अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट डी), सिएटल स्टेडियम

20 जून

  • जर्मनी विरुद्ध कोट डी'आयव्होर (गट ई) टोरोंटो स्टेडियम
  • इक्वेडोर विरुद्ध कुराकाओ (गट ई) कॅन्सस सिटी स्टेडियम
  • नेदरलँड्स विरुद्ध स्वीडन (गट एफ) ह्यूस्टन स्टेडियम
  • ट्युनिशिया विरुद्ध जपान (गट एफ) एस्टाडियो मॉन्टेरी

21 जून

  • उरुग्वे विरुद्ध काबो वर्दे (गट एच), मियामी स्टेडियम
  • स्पेन विरुद्ध सौदी अरेबिया (गट एच), अटलांटा स्टेडियम
  • बेल्जियम विरुद्ध इराण (गट जी), लॉस एंजेलिस स्टेडियम
  • न्यूझीलंड विरुद्ध इजिप्त (गट जी), बीसी प्लेस व्हँकुव्हर

22 जून

  • नॉर्वे विरुद्ध सेनेगल (गट आय) न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम
  • फ्रान्स विरुद्ध बोलिव्हिया/इराक (गट आय) फिलाडेल्फिया स्टेडियम
  • अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रिया (गट जे) डॅलस स्टेडियम
  • जॉर्डन विरुद्ध अल्जेरिया (गट जे) सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

23 जून

  • इंग्लंड विरुद्ध घाणा (गट एल) बोस्टन स्टेडियम
  • पनामा विरुद्ध क्रोएशिया (गट एल) टोरोंटो स्टेडियम
  • पोर्तुगाल विरुद्ध उझबेकिस्तान (गट के) ह्यूस्टन स्टेडियम
  • कोलंबिया विरुद्ध काँगो डीआर (गट के) एस्टाडियो ग्वादालहारा

24 जून

  • स्कॉटलंड विरुद्ध ब्राझील (गट सी), मियामी स्टेडियम
  • मोरोक्को विरुद्ध हैती (गट सी), अटलांटा स्टेडियम
  • स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा (गट बी), बीसी प्लेस व्हँकुव्हर
  • बोस्निया आणि हर्झेगोविना विरुद्ध कतार (गट बी), सिएटल स्टेडियम
  • झेकिया विरुद्ध मेक्सिको (गट ए) मेक्सिको सिटी स्टेडियम
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध कोरिया प्रजासत्ताक (गट ए), एस्टाडियो मॉन्टेरी

25 जून

  • कुराकाओ विरुद्ध कोटे डी'आयव्होर (गट ई), फिलाडेल्फिया स्टेडियम
  • इक्वेडोर विरुद्ध जर्मनी (गट ई), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम
  • जपान विरुद्ध स्वीडन (गट एफ), डॅलस स्टेडियम
  • ट्युनिशिया विरुद्ध नेदरलँड्स (गट एफ), कॅन्सस सिटी स्टेडियम
  • तुर्की विरुद्ध अमेरिका (गट डी), लॉस एंजेलिस स्टेडियम
  • पॅराग्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट डी), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

26 जून

  • नॉर्वे विरुद्ध फ्रान्स (गट आय), बोस्टन स्टेडियम
  • सेनेगल विरुद्ध बोलिव्हिया/इराक (गट आय), टोरोंटो स्टेडियम
  • इजिप्त विरुद्ध इराण (गट जी), सिएटल स्टेडियम
  • न्यूझीलंड विरुद्ध बेल्जियम (गट जी), बीसी प्लेस व्हँकुव्हर
  • काबो वर्दे विरुद्ध सौदी अरेबिया (गट एच), ह्यूस्टन स्टेडियम
  • उरुग्वे विरुद्ध स्पेन (गट एच), एस्टाडियो ग्वादालहारा

27 जून

  • पनामा विरुद्ध इंग्लंड (गट एल), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम
  • क्रोएशिया विरुद्ध घाणा (गट एल), फिलाडेल्फिया स्टेडियम
  • अल्जेरिया विरुद्ध ऑस्ट्रिया (गट जे), कॅन्सस सिटी स्टेडियम
  • जॉर्डन विरुद्ध अर्जेंटिना (गट जे), डॅलस स्टेडियम
  • कोलंबिया विरुद्ध पोर्तुगाल (गट के), मियामी स्टेडियम
  • काँगो डीआर विरुद्ध उझबेकिस्तान (गट के), अटलांटा स्टेडियम