FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप 2022 मधील (FIFA WC 2022) 'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं मॅक्सिकोवर (Argentina vs Mexica) विजय मिळवला. शनिवारी (26 नोव्हेंबर 2022) रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं मेक्सिकोचा 2-0 असा पराभव करून पुढील फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि एन्झो फर्नांडिस (Enzo Fernandez) हे दोघे अर्जेंटिनाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनीही या सामन्यात प्रत्येकी एक-एक गोल केला. अर्जेंटिनाच्या या विजयामुळं ग्रुप-सीमधील राऊंड ऑफ 16 ची शर्यत आणखी रंजक ठरलीय.
सौदी अरेबियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर अर्जेंटिनाच्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान खडतर झालं होतं. मॅक्सिकोविरुद्धचा सामना अर्जेंटिनासाठी करो या मरोचा होता. मेस्सीचा संघ मॅक्सिकोविरुद्ध हरला असता तर त्यांच्यासाठी राऊंड ऑफ 16 चे दरवाजे पूर्णपणे बंद झाले असते. हा सामना अर्निणित ठरला असता तरी अर्जेंटिनाच्या संघाला स्पर्धेबाहेर पडावं लागलं असतं. परंतु, या सामन्यात मेस्सीची जादू चालली आणि अर्जेंटिनानं महत्त्वाचा सामना जिंकला.
ट्वीट-
ट्वीट-
अर्जेंटिनाचं जोरदार कमबॅक
सामन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोचा संघाचं पारडं जड दिसत होतं. पहिल्या हाफमध्ये मॅक्सिकोच्या संघानं काही चांगल्या संधी निर्माण केल्या. परंतु, त्यांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाच्या संघानं जबरदस्त सुरुवात केली. अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड लाइनने गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. दरम्यान, 64 व्या मिनिटाला मेस्सीनं अर्जेंटिनासाठी अप्रितिम गोल केला. या गोलनंतर मेक्सिकोच्या संघानं बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. 87व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसनं अर्जेंटिनाच्या संघासाठी गोल करत संघाला 2-10 आघाडी मिळवून दिली. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ ग्रुप सीच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
हे देखील वाचा-