Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 Round of 16 : फुटबॉल विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 मध्ये फुटबॉल इतिहासातील एक सर्वात अविस्मरणीय आणि थरारक सामना पाहायला मिळाला.

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 Round of 16 : फुटबॉल विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) च्या राउंड ऑफ 16 मध्ये फुटबॉल इतिहासातील एक सर्वात अविस्मरणीय आणि थरारक सामना पाहायला मिळाला. नेमार आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारखे दिग्गज आधीच स्पर्धेतून बाहेर पडले असताना, लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने मात्र इजिप्तच्या जबड्यातून विजय हिरावून आणला. तब्बल 2-0 ने पिछाडीवर असलेल्या अर्जेंटिनाने सामन्याच्या शेवटच्या 14 मिनिटांत सलग 3 गोल मारत इजिप्तचा 3-2 असा पराभव केला आणि क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
Argentina are through to the @FIFAWorldCup quarter-finals as Enzo Fernandez scores the 3,000th goal in FIFA World Cup history 👏🇦🇷 pic.twitter.com/gKg0tafSMr
— FIFA (@FIFAcom) July 7, 2026
मिनिटा-मिनिटाचा खेळ, मेस्सीची पेनल्टी हुकली
सामन्याची सुरुवात इजिप्तने अत्यंत आक्रमक केली. 15 व्या मिनिटाला यासिर इब्राहिमने शानदार गोल करत इजिप्तला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाला सामन्यात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी 21 व्या मिनिटाला मिळाली. परंतु, स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरला, ज्यामुळे अर्जेंटिनावरील दबाव आणखी वाढला. उत्तरार्धात इजिप्तच्या मोस्तफा जिकोने 67 व्या मिनिटाला दुसरा गोल डागला आणि इजिप्तची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. या क्षणाला अर्जेंटिना विश्वचषकातून बाहेर पडणार असेच वाटत होते.
14 मिनिटांचा चमत्कार आणि अर्जेंटिनाचे पुनरागमन
67 मिनिटांपर्यंत 2-0 ने मागे असलेल्या अर्जेंटिनाने हार मानली नाही. त्यांनी अशा प्रकारे खेळ फिरवला की संपूर्ण स्टेडियम अवाक झाले. अर्जेंटिनाच्या पुनरागमनाची सुरुवात 79 व्या मिनिटाला झाली, जेव्हा ख्रिस्तियन रोमेरोने गोल करून स्कोअर 2-1 केला. पेनल्टी चुकल्याची कसर भरून काढत लिओनेल मेस्सीने 83 व्या मिनिटाला मैदानी गोल केला आणि सामन्यात 2-2 अशी अंगावर काटा आणणारी बरोबरी साधली. इथून सामन्याचे चित्र पूर्णपणे पलटले. सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असे वाटत असतानाच, 90+2 व्या मिनिटाला (इंज्युरी टाईम) एंजो फर्नांडिजने निर्णायक आणि विजयी गोल मारला. या गोलसह अर्जेंटिनाने 3-2 अशी ऐतिहासिक आघाडी घेतली.
मैदानाबाहेर ड्रामा
सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळाला. सामन्याच्या 90+4 व्या मिनिटाला इजिप्तच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य साफान एलसाघिर यांना पंचांनी 'रेड कार्ड' दाखवून मैदाबाहेर काढले. पण या ऐतिहासिक विजयामुळे लिओनेल मेस्सीचे पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न जिवंत राहिले आहे. या विजयासह अर्जेंटिनाने क्वार्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केली असून, आता जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष अर्जेंटिनाच्या पुढील सामन्याकडे लागले आहे.
हे ही वाचा -
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या























