Argentina vs Switzerland Highlights FIFA World Cup 2026 : फुटबॉल चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या सामन्यात अखेर अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडवर 3-1 असा दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. नियोजित 90 मिनिटांनंतर 1-1 असा बरोबरीत राहिल्याने सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. त्यानंतर अर्जेंटिनाने दोन निर्णायक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेतील विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले.

Continues below advertisement

सामन्याचा थरार, अवघ्या 10व्या मिनिटाला गोल

सामन्याच्या अवघ्या 10व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आघाडी घेतली. लिओनेल मेसीने घेतलेल्या कॉर्नरवर अॅलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टरने अप्रतिम हेडर मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला आणि अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुरुवातीपासून अर्जेंटिनाचा दबदबा दिसत असला तरी स्वित्झर्लंडच्या बचावफळीने त्यानंतर पहिल्या हाफमध्ये आणखी गोल होऊ दिला नाही. दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंडने जोरदार पुनरागमन केले. 67व्या मिनिटाला डॅन डॉयने अचूक फिनिश करत गोल नोंदवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, मात्र कोणालाही निर्णायक गोल करता आला नाही.

Continues below advertisement

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्जेंटिनाचा खेळ काहीसा आक्रमक झाला. त्यामुळे लौतारो मार्टिनेझ आणि थियागो अल्माडा यांना पिवळे कार्डही दाखवण्यात आले. नियोजित वेळ संपल्यानंतर दिलेल्या अतिरिक्त 9 मिनिटांतही कोणताही गोल झाला नाही आणि सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला.

84व्या मिनिटाला मेसीला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र तो हा प्रयत्न यशस्वी करू शकला नाही. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या क्षणी मेसीच्या आणखी एका कॉर्नरवर अर्जेंटिनाला गोलची संधी मिळाली, पण स्वित्झर्लंडच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव करत सामना जिवंत ठेवला.

एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाचा जिंकली 

सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाने आपली खरी ताकद दाखवली. 112व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने शानदार गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्वित्झर्लंडने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्जेंटिनाच्या बचावाने त्यांना यश मिळू दिले नाही. अखेर एक्स्ट्रा टाइमच्या शेवटच्या क्षणी, 121व्या मिनिटाला लौतारो मार्टिनेझने आणखी एक गोल करत अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला. अंतिम शिट्टी वाजताच अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या विजयात मेसीने गोल केला नसला तरी त्याने आक्रमणाची सूत्रे प्रभावीपणे सांभाळली. मॅक अ‍ॅलिस्टर, ज्युलियन अल्वारेझ आणि लौतारो मार्टिनेझ यांच्या गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाने दमदार कामगिरी करत विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या.

हे ही वाचा -

Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?