FIFA World Cup 2026 : अवघ्याजगाचंलक्षलागूनराहिलेल्या फिफा विश्वचषकाच्याअंतिमसामन्यात (FIFA World Cup 2026) लाल जर्सीतला स्पेन (Spain) पुन्हा एकदा जगज्जेता ठरला आहे. अर्जेन्टिनाला (Argentina) हरवून स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर (FIFA World Cup 2026 News) नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात स्पेनची अर्जेन्टिनावर 1-0 अशा गोलफरकानं मात करततब्बल 16 वर्षांनी स्पेननं पुन्हा फिफा विश्वचषक जिंकला आहे. तर अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू फेरान टॉरेसचा गोल अतिशय निर्णायक ठरला असून मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. (Spain vs Argentina FIFA World Cup 2026

Continues below advertisement

स्पेननं बलाढ्य अर्जेन्टिनाला हरवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अमेरिकेच्या न्यूजर्सीतील मेटलाईफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेननं अर्जेन्टिनाला 1-0 अशा फरकानं मात दिली. अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या फेरान टॉरेसनं डागलेला गोल स्पेनच्या विजयात निर्णायक ठरला. या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं. निर्धारित 90 मिनिटात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र अतिरिक्त वेळेत अर्जेन्टिनाचा बचाव भेदण्यात स्पेन यशस्वी ठरला आणि 106व्या मिनिटाला टॉरेसनं शानदार गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह तब्बल 16 वर्षांनी स्पेननं पुन्हा एकदा फिफा विश्वचषकाचा मानकरी ठरला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांच्या हस्ते कर्णधार रॉड्रिगोनं विश्वचषक स्वीकारला आणि स्पेनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

FIFA World Cup 2026 Lionel Messi : पराभवानंतर भर मैदानातच मेस्सीच्या डोळ्यात पाणी

Continues below advertisement

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अर्जेन्टिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला कमालीचा भावूक झालेला दिसला. २०२२ साली अर्जेन्टिनाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीनं यंदाही दमदार कामगिरी करत संघाला फायनलपर्यंत नेलं. मात्र स्पेनसमोर अर्जेन्टिनाचं आक्रमण फिकं पडलं आणि त्यांना गोल करण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरच राहिलं. म्हणूनच सामन्यानंतर मेस्सीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो भर मैदानात रडताना दिसला.

Spain vs Argentina : स्पेनच्या विश्वविजयाचा राजधानी माद्रिदसह बार्सिलोना, सेव्हियामध्येही चाहत्यांचं सेलिब्रेशन

स्पेनच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर राजधानी माद्रिदमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी हजारो चाहते स्पॅनिश ध्वज घेऊन माद्रिदच्या सिबेलेस स्क्वेअर इथे एकत्र जमले होते. त्यांनी विजयी जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून सोडला. माद्रिदसह बार्सिलोना, सेव्हिया आणि इतर शहरांमध्येही चाहत्यांनी रस्त्यावर उतरून स्पेनच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला. दरम्यान विश्वविजेता स्पॅनिश संघ मायदेशी परतल्यानंतर खुल्या बसमधून विजय मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Spain: स्पेनच्या विजयात गोलरक्षक सिमॉनची कामगिरी महत्त्वाची; सिमॉन ठरला गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराचा मानकरी

स्पेनच्या दुसऱ्या विश्वचषक विजयात गोलरक्षक उनाई सिमॉनचाही मोठा वाटा राहिला. सिमॉननं या संपूर्ण स्पर्धेत भक्कम बचाव करताना आठ सामन्यात केवळ एकच गोल स्वीकारला. अंतिम सामन्यातही अर्जेन्टिनाच्या आक्रमणासमोर सिमॉन भिंत बनून उभा राहिला. त्याच्या याच कामगिरीमुळे विश्वचषकातील सर्वोत्तम गोलरक्षकासाठीचा गोल्डन ग्लोव्ह सिमॉनला देण्यात आला.

FIFA World Cup 2026 : विश्वचषक, गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल... सगळंच हुकलं; GOAT मेस्सीला अश्रू अनावर!

दरम्यान, पहिल्या 90 मिनिटांत स्पेन अनेक गोल करू शकला असता, परंतु अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने अनेक बचाव करून आपल्या संघाला सामन्यात टिकवून ठेवले. या सामन्यापूर्वीच 2026 विश्वचषकात आठ गोल केलेल्या लिओनेल मेस्सीला गोल्डन बूट जिंकण्याची संधीही हुकली. गोल्डन बूट फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने जिंकला, ज्याने संपूर्ण स्पर्धेत एकूण 10 गोल केले. इटली आणि ब्राझिलनंतर, सलग दोन विश्वचषक जिंकणारा तिसरा संघ बनण्याची संधी अर्जेंटिनाला होती. इटलीने 1934 आणि 1938 मध्ये, तर ब्राझिलने 1958 आणि 1962 चे विश्वचषक जिंकले होते. अर्जेंटिनाने 2022 च्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला 4-2 ने हरवले, पण 2026 मध्ये स्पेनच्या आव्हानाचा सामना करू शकले नाही.

इतर महत्वाच्या बातम्या