मुंबई : भारत दौऱ्यावर येण्याआधी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा जलदगती गोलंदाज मार्क वुड घोट्याच्या दुखापतीमुळे भारतीय दौऱ्याला मुकणार आहे.
कौंटी क्रिकेटमधील सामन्यादरम्यान वुडला दुखापत झाली होती. एका वर्षात वुडला तिसऱ्यांदा घोट्याची दुखपत झाली आहे.
दुखापतीमुळे मार्क वुड बांगलादेश दौऱ्यातूनही बाहेर राहावं लागलं आहे. भारत दौऱ्याआधी दुखपात बरी होईल, अशी वुड आणि संघ व्यवस्थापनला आशा होती. परंतु कौंटी क्रिकेटमध्ये त्याची दुखापत बळावली. त्यानंतर त्याला समजलं की, घोट्यामध्ये फ्रॅक्चर आहे.
वुडची दुखापत ही इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण वुड एकाच विशिष्ट वेगाने दिवसात 30-35 ते षटका टाकू शकता. शिवाय भारतीय पीचवर त्याला रिव्हर्स स्विंगचाही फायदा मिळतो.
इंग्लंडचा संघ भारताविरोधात पाच कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेण्टी20 सामने खेळणार आहे. 9 नोव्हेंबरपासून दौऱ्याची सुरुवात होईल.