Sara Tendulkar: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या लाडक्या मुलीला साराला सचिन तेंडुलकर फाऊंडेशनचे संचालक बनवले आहे. खुद्द सचिनने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर साराच्या शिक्षण आणि पदवीची चर्चा सुरू झाली आहे. साराला फॅशन आणि मॉडेलिंगमध्येही खूप रस आहे. मॉडेलिंगमध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. तिने अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही केल्या आहेत. पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकसोबतच तिने न्यूयॉर्क आणि मिलान फॅशन वीकमध्येही तिची चर्चा झाली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सारा तेंडुलकर सुंदर, फॅशनेबल आणि हुशार आहे. तिने मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतलं आहे. सारा तेंडुलकरच्या शैक्षणिक शिक्षणाबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. सारा तेंडुलकरने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर सारा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली, शालेय शिक्षणानंतर सारा लंडनला गेली आणि लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि वैद्यकीय शिक्षण घेतले. साराची आई अंजली तेंडुलकर याही बालरोगतज्ज्ञ आहेत. तिच्या पदवीनंतर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनीही कॉलेजच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली होती.
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सारा तेंडुलकरने लंडन युनिव्हर्सिटीमध्ये M.Sc ला प्रवेश घेतला. 2024 मध्ये तिची पदवी पूर्ण केली आहे. सारा तेंडुलकरने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थमध्ये एमएससी पदवी मिळवली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आहे.
सोशल मीडियावर 7.4 मिलियन फॉलोअर्स
साराने सोशल मीडियावर अनेक फॅशन आणि ब्युटी ब्रँडसाठी प्रमोशनल शॉट्स शेअर केलेले आहेत, चाहते तिच्या सौंदर्य आणि साधेपणाचे कौतुक करतात. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर त्याचे 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.