नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये शानदार कामगिरी करणारी जिम्नॅस्ट दीपा करमाकरने तिला गिफ्ट म्हणून दिलेली बीएमडब्लू कार परत केली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते दीपाला ही कार गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. आगरतळाच्या अरुंद रस्त्यावर ही कार चालवण्यास अडचणी येत असल्याने दीपाने कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिनच्या हस्ते प्रदान केलेली BMW दीपा कर्माकर परत करणार




दीपाने खरेदी केली नवी कार!
दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी म्हणाले की, "बीएमडब्लू कार परत केल्यानंतर दीपाला 25 लाख रुपये मिळाले. या पैशांमधून तिने ह्युंदाई एलेन्ट्रा ही नवी कार खरेदी केली आहे. या कारचं सर्व्हिस स्टेशन आगरतळामध्येही आहे." रिओ ऑलिम्पिकनंतर दीपाशिवाय पीव्ही सिंधू, साक्षी मलिक आणि पुलेला गोपीचंद यांना भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते कार भेट म्हणून दिली होती.




सचिनच्या हस्ते साक्षी, सिंधू, दीपा कर्माकर आणि गोपीचंद यांना BMW भेट


पदक हुकलं, पण भारतीयांचं मन जिंकलं!
अतिशय कमी पॉईंट्सच्या फरकाने दीपा कर्माकरचं ऑलिम्पिक कांस्यपदक हुकलं. पण शानदार कामगिरीमुळे तिने प्रत्येक भारतीयाच मन जिंकलं. दीपा कर्माकर जिम्नॅस्टिकमध्ये प्रोदूनोव्हा वॉल्ट करते, ज्याला 'वॉल्ट ऑफ द डेथ'ही म्हटलं जातं.