जयपूर : इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता. जगभरात कॅप्टन कूल अशी ख्याती मिळवलेला धोनी पंचांशी वाद घालत होता. डगआऊटमध्ये बसलेल्या महेंद्रसिंह धोनीने थेट मैदावर जाऊन पंचांशी वाद घातला. या कृत्यामुळे धोनीला मॅच फीसमधील 50% रक्कम दंड म्हणून भरावी लागली. परंतु दंड भरल्यानंतरही धोनी खूप स्वस्तात सुटला, असे मत भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. सेहवाग म्हणाला की, धोनीवर किमान 1-2 सामन्यांची बंदी घालायला हवी होती.

धोनीला कधीही, कोणीही मैदानात वाद घालताना, पंचांशी हुज्जत घालताना पाहिलेले नाही. परंतु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीचा कूल अवतार दिसला नाही, उलट धोनी त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मैदानावर वाद घालताना, पंचांशी हुज्जत घालताना पाहायला मिळाला. धोनीला असं रागावलेलं पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. धोनीच्या कित्येक चाहत्यांना धोनीची अशी प्रतिक्रिया पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

नवी दिल्ली | 2019 साठी भाजपकडून धोनी, सहवाग आणि गंभीर मैदानात?



काय घडलं होतं?
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकातील 3 चेंडू उरले होते. चेन्नईला या तीन चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. षटकातला चौथा चेंटू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला, त्यानंतर पंच नो बॉलच्या इशारा करु लागले. परंतु दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. हे पाहून चिडलेला धोनी थेट मैदानात घुसला व त्याने थेट पंचांना याबाबत जाब विचारला. या प्रकारामुळे धोनीला सामन्याच्या फीसपैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली आहे.

एका वेबसाईटला देत असाना विरेंद्र सेहवागला याबाबत विचारण्यात आले. यावर वीरु म्हणाला की, धोनी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासाठी वागला तसा भारतीय संघासाठी वागला असता तर मला आनंद झाला असता. चेन्नईच्या संघासाठी धोनी जास्तच भावनिक झाला. दोन फलंदाज खेळपट्टीवर उभे असाताना धोनीला मैदानावर जाण्याची आवश्यकता नव्हती. परंतु धोनी याप्रकरणी खूप स्वस्तात सुटला आहे. धोनीवर 1-2 सामन्यांची बंदी झाली असती, तर यामुळे इतर खेळाडूंना धडा मिळाला असता.


धोनी, रोहित शर्मा आणि विराटच्या सध्याच्या कामगिरीविषयी वीरुला काय वाटतं?