रांची : मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयने आयपीएलमधील दोन महत्वाचे संघ चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली होती. दोन वर्षाच्या बंदीनंतर आता हे दोन्हीही संघ नव्या आयपीएल मोसमासाठी सज्ज झाले आहेत. 2015 साली घालण्यात आलेली बंदी अखेर संपली आहे.
सीएसकेही आता आयपीएलच्या नव्या मोसमात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसकेचा तत्कालीन कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी पुन्ही सीएसकेकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. या गोष्टीची त्याने फक्त माहितीच दिली नाही, तर एक पिवळ्या रंगाचा बोलका फोटो शेअर केला आहे.
धोनीच्या टी शर्टवर 7 हा त्याचा लकी नंबर लिहिलेला आहे. आणि फोटोला 'थला' म्हणजे बॉस अशी कॅप्शन दिली आहे. धोनीने शेअर केलेला फोटो हा त्याच्या नव्या घरासमोरचा असल्याचं बोललं जात आहे.
सीएसकेवर बंदी घालण्यात आल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुंपरजायंटच्या ताफ्यात सहभागी झाला होता. मात्र 2016 साली पुणे संघ प्ले ऑफमधूनच बाहेर पडला. ज्यानंतर 2017 च्या मोसमासाठी धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं.
धोनीने आयपीएलच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 2008 पासून ते 2015 पर्यंत सीएसकेचं कर्णधारपद सांभाळलं. आता सीएसकेचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीकडे कर्णधारपदाची धुरा जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
सीएसकेवरील बंदी अधिकृतपणे संपली आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं तोच स्टाफ आणि त्याच खेळाडूंसोबत पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न करु. बीसीसीआयने पुन्हा त्याच खेळाडूंना परत घेण्याची परवानगी दिली, तर धोनीच कर्णधार असेल, असंही सीएसकेने स्पष्ट केलं आहे.
धोनीसोबत अजूनपर्यंत चर्चा केलेली नाही. कारण त्याचा पुण्यासोबत असलेला करार या वर्षाअखेरपर्यंत संपणार आहे. त्यानंतर धोनीशी चर्चा केली जाईल, असंही सीएसकेने सांगितलं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नई सुपरकिंग्जमध्ये परतण्यासाठी धोनी आतुर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2017 12:54 PM (IST)
सीएसकेही आता आयपीएलच्या नव्या मोसमात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसकेचा तत्कालीन कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी पुन्ही सीएसकेकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. या गोष्टीची त्याने फक्त माहितीच दिली नाही, तर एक पिवळ्या रंगाचा बोलका फोटो शेअर केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -