MS Dhoni : एकेकाळी जगातील सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्रसिंह धोनी रविवारी आपल्या संघाला आयपीएल 2025 मध्ये विजयापर्यंत नेऊ शकला नाही. शेवटच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर आल्यानंतर, 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जेव्हा तो क्रीजवर पोहोचला तेव्हा चेन्नईला 12 चेंडूत 39 धावा आणि शेवटच्या षटकात 20 धावा हव्या होत्या, पण माहीची जादू चालली नाही. सीएसके टार्गेटपासून सहा धावा दूर राहिला. धोनीने 11 चेंडूत 16 धावा केल्या. पण वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर स्पष्ट दिसत होता. त्याने 19व्या षटकात तुषार देशपांडेला एक चौकार आणि एक षटकार ठोकला, पण संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात विकेट गमावली.

संदीप शर्माने 20व्या षटकाची सुरुवात वाईडने केली. विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावा वाचवायला हव्या होत्या. धोनी स्ट्राइकवर होता. संदीपने पहिल्या दबावात वाईड टाकला. संदीपने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो डेथ ओव्हर्सचा मास्टर बॉलर आहे. पुढच्याच चेंडूवर माहीची विकेट घेतली. शिमरॉन हेटमायरने सीमारेषेजवळ डायव्हिंग करून झेल घेतला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर धोनीच्या फलंदाजी आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

धोनी आता ओव्हररेटेड असून चेन्नईसाठी पनवती

बाॅलिवूड गायक सोनू निगमने धोनीच्या कामगिरीवरून बोचरी टीका केली आहे. धोनी आता ओव्हररेटेड असून चेन्नईसाठी पनवती झाल्याची टीका केली आहे. त्याला संघातून हटवण्याची मागणी केली आहे. सोनू निगमने युवराज सिंगच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची सुद्धा आठवण करून दिली आहे. योगराज सिंग यांनी धोनीवर गंभीर आरोप केले होते. दुसरीकडे, भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनेही धोनीच्या फिनिशिंग क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अलिकडील काळात धोनीने संघाला कधी सामने जिंकून दिले हे आठवत नाही

अलिकडील काळात धोनीने संघाला कधी सामने जिंकून दिले हे आठवत नाही, असे सेहवागचे म्हणणे आहे. त्याने क्रिकबझला सांगितले की, "20 मध्ये 40 धावा करणे हे अवघड काम आहे. खेळाडू कितीही मोठा असला तरी ते अवघड काम आहे. तुम्ही एक किंवा दोन प्रसंगी जिंकता, एवढेच. मला आठवते की धोनीने अक्षर पटेलच्या चेंडूवर 24 किंवा 25 धावा केल्या होत्या आणि एकदा धरमशालामध्ये त्याने इरफान पठाणच्या चेंडूवर 19 किंवा 20 धावा केल्या होत्या." तो पुढे म्हणाला, "तुम्हाला फक्त एक किंवा दोन सामने आठवत आहेत. तुम्हाला अलीकडचा एकही सामना आठवत नाही. गेल्या पाच वर्षांपासून CSK 180 पेक्षा जास्त धावा करू शकलेली नाही."

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईचा संघ सामना जिंकेल अशी आशा चाहत्यांना होती. शेवटच्या षटकात फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. संदीप शर्माने शेवटच्या षटकाने सामन्याचा मार्ग बदलला. शेवटच्या 6 चेंडूंवर विजयासाठी 20 धावांची गरज होती, पण धोनी बाद होताच आशांना मोठा धक्का बसला आणि अखेर संघाचा पराभव झाला.

इतर महत्वाच्या बातम्या