धर्मशाला: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतानं 2-1 नं विजय मिळवत कांगारुंना लोळवलं. शेवटचा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. कारण या सामन्यात जो विजय मिळवेल तोच मालिका खिशात घालणार होता. त्यामुळे या सामन्यातील प्रत्येक रन आणि विकेट दोन्ही संघांसाठी प्रचंड महत्वाचे होते. धर्मशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कमिन्सच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाला मैदानावरील पंचांनी बाद ठरवलं. पण यावेळी भारताच्या मदतीला डीआरएस धावून आलं. त्या महत्वाच्या क्षणी डीआरएसनं जाडेजाला नाबाद ठरवलं.


चौथ्या दिवशी एक अशी वेळ आली की, पंचांनी खेळाडूंना सांगितलं की, तांत्रिक कारणांमुळे (वीजेच्या कमतरतेमुळे) काही वेळासाठी डीआरएस काम करेनासं झालं आहे. दिवसाच्या तिसऱ्या षटकातच पंचांनी खेळाडूंना सांगितलं की, तांत्रिक बिघाडामुळे चेंडू ट्रॅक करु शकत नाही. फक्त स्निको मीटर सुरु आहे.
दरम्यान, सामन्यातील त्या वेळेत दोन्ही संघातील कुणालाही डीआरएसची गरज पडली नाही. काही वेळानंतर डीआरएस यंत्रणा पूर्ववत झाली. पण सामन्यात जर काही चुकीचा निर्णय दिला गेला असता तर त्याचे परिणाम दोन्ही संघापैकी कुणाला तरी भोगावेच लागले असते.

संबंधित बातम्या:

 

'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!  

सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण

मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद

मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय

IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!