Cristiano Ronaldo  FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-final) धडक मारली (FIFA world Cup 2026 Portugal vs Spain) आहे. या पराभवामुळे दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले आहे.

Continues below advertisement

91 व्या मिनिटाला नेमकं काय घडलं? (FIFA world Cup 2026 Portugal vs Spain)

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध जोरदार संघर्ष केला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. दोन्ही संघांच्या मजबूत बचाव फळीमुळे आणि गोलकीपरच्या सतर्कतेमुळे सामना बराच काळ गोलशून्य राहिला. मात्र, सामन्याचा निकाल 90+1 व्या मिनिटाला लागला. एक्स्ट्रा टाइममध्ये स्पेनचा खेळाडू मिकेल मेरिनो याने अतिशय चपळाई दाखवत चेंडू जाळ्यात मारला आणि स्पेनला 1-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. नजर हटली आणि दुर्घटना घडली असाच काहीसा प्रकार पोर्तुगालच्या बाबतीत घडला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी झालेल्या या गोलने पोर्तुगालच्या आशा धुळीस मिळवल्या.

स्पेनसाठी मिकेल मेरिनोने केला गोल- (Portugal vs Spain)

सामन्याच्या 'इंज्युरी टाइम'मध्ये (90+1 व्या मिनिटाला) मिकेल मेरिनोने स्पेनसाठी सामन्यातील एकमेव गोल केला. मेरिनो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. फेरान टोरेसकडून मिळालेला पास स्वीकारून त्याने गोलरक्षक डिएगो कोस्टाच्या उजव्या बाजूने चेंडू जाळीत धाडला. हा गोल स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर-फायनलमध्ये) पोहोचवण्यासाठी पुरेसा ठरला. या फिफा विश्वचषकात आतापर्यंत कोणत्याही संघाला स्पेनविरुद्ध गोल करता आलेला नाही.

Continues below advertisement

रोनाल्डोसाठी मोठा धक्का- (Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026)

41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी हा सहावा वर्ल्डकप होता. विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केले, परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पराभवानंतर रोनाल्डो मैदानावरच पूर्णपणे कोसळला. त्याच्या डोळ्यांतील अश्रू हे त्याच्या अपयशाचे दुःख आणि वर्ल्डकपसाठी केलेल्या तपस्येची साक्ष देत होते. दुसरीकडे, या विजयाने स्पेनने स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.  

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: