मुंबई : भारतीय क्रिकेट संघाजा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा पाकिस्तान संघ आणि फॅन्सची थट्टा केली आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून यामध्ये भारत-पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.


 

 

या सामन्यात भारताचाच विजय होणार असल्याचा दावा करत सेहवागने पाकिस्तानी फॅन्सना सल्लाही दिला आहे. सेहवागच्या ट्वीटनंतर अनेक मजेशीर कमेंट्स येण्यास सुरुवात झाली.

 

 

सेहवागने काय लिहिलं आहे?

 

सेहवागने ट्विटरवर लिहिलं आहे की, "अरे व्वा, भारत-पाकिस्तान सामन्याला केवळ एक वर्ष बाकी आहे. मी पाकिस्तानी भावांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचे टीव्ही फोडू नयेत. खेळात हार जीत सुरुच असते.

 

https://twitter.com/virendersehwag/status/739098505621340163

सेहवागच्या या ट्वीटनंतर अनेक पाकिस्तानी फॅन्सनी त्याला उत्तर दिलं, तर भारतीय फॅन्सनी वीरुचा बचाव करण्यास सुरुवात केली.
पुढील वर्षी 1 जूनपासून होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. 4 जून रोजी एजबेस्टनमध्ये भारत-पाकिस्तान हा रोमांचक सामना पाहायला मिळेल.

 

 

पाकिस्तानी फॅन्सचा संताप

https://twitter.com/imSMohsin/status/739161796972544000

 


सेहवागच्या ट्वीटला रिप्लाय

- एका भारतीय चाहत्याने लिहिलं आहे की, "निवृत्त झाल्यानंतरही पहिल्याच बॉलपासून आक्रमकपणे फलंदाजी करण्याची सेहवागची सवय मोडलेली नाही."

 

 

- तर आणखी एका फॅनने लिहिलं आहे, "पाकिस्तानी फॅन्सना विनंती आहे की, त्यांनी शांत राहावं आणि मौका..मौका.. ची वाट पाहावी. मात्र हा सामनाही पाकिस्तान गमावणार."

 
- "ना इश्क में... ना प्यार में है... जो मजा है पाकिस्तान की हार में है", असं ट्वीट एकाने केलं आहे.

 
- "जर एखाद्या गोष्टीला हॉट टॉपिक बनवणं ही कला असेल तर सेहवाग त्याचा गुरु आहे, असंही एका ट्विपलने म्हटलं आहे."