याआधी इंग्लंडच्या कॉलीन कॉडरे आणि भारताच्या रमण लांबा यांनी वाढदिवशीच त्रिशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. कॉलीन कॉडरेनं 1962 साली आपल्या तिसाव्या जन्मदिनी त्रिशतक झळकावलं होतं. तर रमण लांबानं 1995ला 35व्या जन्मदिनादिवशी 312 धावा फटकावल्या होत्या.
प्रशांतनं आपल्या खेळीत 363 चेंडूंचा सामना करत 44 चौकार आणि दोन षटकारांसह 338 फटकावल्या. त्याच्या या खेळीनं हिमाचलनं आपल्या पहिल्या डावात 729 धावांचा डोंगर उभारला.