कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शमीविरोधात भारतीय दंडविधान कलम 498 अ अंतर्गत हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीची पत्नी हसीन जहांच्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.
मागील वर्षी हसीन जहांने शारीरिक अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप करत शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
मोहम्मद शमी भारतीय संघातील खेळाडू आहे. आगामी विश्वचषकासाठी त्याच्याही नावाची चर्चा आहे. त्यात आता हसीन जहांच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्याच्या विश्वचषक तयारीवर परिणाम होऊ शकतो. शमीविरोधात कलम 498 अ आणि त्याचा भाऊ हसीब अहमदवर 498 अ आणि 354 अ अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोर्टाने शमीला समन्स बजावला असून त्याला 22 जून रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितल्याचं पोलीस म्हणाले. परंतु विश्वचषकादरम्यान सुनावणीसाठी हजर राहणं शमीसाठी काहीसं अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे.
हसीन जहां म्हणाली की, "पोलिसांनी आयपीसीच्या कलम 498 अ (हुंड्यासाठी छळ) आणि 354 (लैंगिक छळ) अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं आहे. हसीनने याआधीही शमीवर कौटुंबिक हिंसाचार, विवाहबाह्य संबंधांपासून मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता."
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांची आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या पार्टीत भेट झाली होती. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोन वर्षांनी 7 एप्रिल 2014 रोजी शमी आणि जहांचं लग्न झालं.
शमीच्या अडचणी वाढल्या, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विश्वचषकादरम्यान सुनावणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2019 10:58 AM (IST)
मागील वर्षी हसीन जहांने शारीरिक अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप करत शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -