Yuzvendra Chawal and RJ Mahvash : भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महावश यांनी अचानक एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. यासोबतच दोघांच्या अलीकडील पोस्ट्स आणि स्टोरीज पाहता, त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलंय का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. युजवेंद्र चहलचा कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी 2025 मध्ये घटस्फोट झाल्यानंतरच आरजे महावशचं नाव चहलसोबत जोडलं जाऊ लागलं. मागील वर्षी आयपीएल सामन्यांदरम्यान दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. महवश अनेकदा स्टेडियममध्ये चहलला पाठिंबा देताना दिसली होती. यामुळे दोघं डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
मी सिंगल आहे आणि खुश.... - चहल
इतकंच नाही, तर अलीकडेच चहल आणि महवश लंडन ट्रिपवर असल्याचंही समोर आलं. दोघांनी लंडनमधील एकाच लोकेशनवरील फोटो आपल्या-आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र, या नात्यावर आजवर कुणीही अधिकृत शिक्कामोर्तब केलं नव्हतं. महवशसोबतच्या नात्याबाबत विचारलं असता, चहलने एका मुलाखतीत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, “यार, मित्र-मैत्रिणी फिरतात, त्यात काही चुकीचं नाही. व्हिडिओ येतात म्हणून लगेच नातं आहे असं होत नाही. काहीच नाही, मी सिंगल आहे आणि खुश आहे.”
इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो
एकेकाळी सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट्स लाईक करणारे चहल आणि महवश आता एकमेकांना फॉलो करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या अनफॉलोमुळेच त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरजे महवशने शेअर केलेल्या एका क्रिप्टिक व्हिडिओमुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. त्या व्हिडिओत महवश म्हणते, “2026 मध्ये माझं ‘फिक्स इट’ बिहेवियर सगळ्यांसाठी संपलं आहे. कुणी घाणेरडी हरकत केली, तर तो माणूस माझ्या आयुष्यातून बाहेर. आता कुणाच्या वाईट पर्सनॅलिटीवर काम करण्याची हिंमत उरलेली नाही. माझी मेंटल हेल्थही मला सांभाळायची आहे.”
ती पुढे म्हणते, “चुकून काहीच होत नाही, सगळं विचारपूर्वक केलं जातं. मी कुणालाही फिक्स करू शकत नाही.” या वक्तव्यांचा रोख थेट युजवेंद्र चहलच्याच दिशेने असल्याचा अंदाज सोशल मीडिया युजर्स लावत आहेत.
चहलची सूचक इंस्टा स्टोरी
याच दरम्यान, चहलनेही इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत सूचक संदेश दिला. त्यात लिहिलं होतं, “कृष्ण अर्जुनाला म्हणाला होता की, जगात प्रत्येकाला तुम्ही स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. काहीवेळेला शांत राहणे योग्य असते, इतरांना तुम्ही चुकीचे वाटत असाल, तर वाटू दे.” ही स्टोरी महवशच्या व्हिडिओशी जोडून पाहिली जात आहे.
हे ही वाचा -
