Yuvraj Singh: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj Singh) केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. युवराज सिंहने एका पॉडकास्टमध्ये 2008 मधील एक किस्सा सांगितला. यामध्ये तो एका अभिनेत्रीला डेट करत होता, जिचे स्लिप-ऑन्स (चप्पल) घालून तो एअरपोर्टवर गेला जे पाहून सर्वच त्याची मजा घेत होते, असं युवराज सिंह म्हणाला. 


युवराज सिंह (Yuvraj Singh) म्हणाला की,  मी एका अभिनेत्रीला डेट करत होतो. ती अॅडलेडमध्ये शूटिंग करत होती. तेव्हा मी तिला आपण काही काळ न भेटण्याचा आग्रह केला. पण ती माझ्यासोबत बसमध्ये कॅनबेराला आली. ती म्हणाली की, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी तिला सांगितलं होतं, हे बघ काही दिवस आपण नको भेटूया, कारण मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे आणि मला फोकस करून खेळायचं आहे. तिने अक्षरश माझ्या बसचा कॅनबेरापर्यंत पाठलाग केला, असं युवराज सिंहने सांगितले. 


तिची घालून युवराज सिंह गेला एअरपोर्टवर-


या पॉडकास्टमध्ये चर्चा करताना युवराज सिंहने एअरपोर्टवरील किस्सा देखील सांगितला. मी सकाळी तिला विचारलं, अरे माझं शुज कुठे आहेत? ती म्हणाली, मी ते बॅगेत पॅक केले. मग मी विचारलं, अरे मग मी बसमध्ये काय घालून जाऊ? यावर ती म्हणाली, माझी चप्पल घाल… यानंतर त्याचे शूज पॅक केल्याने युवराजला जबरदस्ती तिचे गुलाबी रंगाचे चप्पल घालायला लागल्याचा मजेशीर किस्सा युवराज सिंहने सांगितला. 






युवराजने संबंधित अभिनेत्रीचे नाव घेणे टाळले-


युवराजने संबंधित अभिनेत्रीचे नाव घेणे टाळले. पण, चाहत्यांसह नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्याचा तर्क लावला. 2007 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिका पदुकोणला युवराज डेट करत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. यावरून नेटकऱ्यांनी सिक्सर किंग युवराजला ट्रोल केले. असा किस्सा सांगण्याची काय गरज होती, असे अनेकांनी म्हटले.


टीम इंडिया बॉर्डर-गावसकर मालिका जिंकणार-


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.  युवराज सिंगने आगामी बॉर्डर गावस्कर मालिकेतील विजेत्याबाबतही भाकित केलं. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ही मालिका भारतीय संघ 3-2 ने जिंकेल असा दावा युवराज सिंहने केला आहे. 


संबंधित बातमी:


IPL 2025: रोहित, विराटपासून धोनीपर्यंत...; फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, संभाव्य यादी आली समोर