Yashasvi Jaiswal 1st Century in ODI : यशस्वी जैस्वालने आपल्या वनडे करिअरमधील पहिले शतक ठोकले आहे. हे शतक त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 111 चेंडूत पूर्ण केले. अर्धशतक 75 चेंडूत पूर्ण केली, तर पुढील 50 रन त्याने केवळ 35 चेंडूत ठोकले. यशस्वी आता तीनही फॉरमॅट्समध्ये शतक ठोकणारा सहावा भारतीय बनला आहेत. यापूर्वी फक्त विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि शुभमन गिल हे पाच भारतीय हे खेळाडू होते. विशाखापत्तनममध्ये खेळलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि जैस्वालने ओपनिंग करत 155 रन्सची भागीदारी केली, ज्यामुळे संघाला जोरदार सुरुवात मिळाली.
तिन्ही स्वरूपात शतके करणारा भारतीय
यशस्वी जैस्वालने यापूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत. आता, त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या चौथ्या सामन्यात त्याने एकदिवसीय शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, तिन्ही स्वरूपात फक्त पाच भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि शुभमन गिल. अशी कामगिरी करणारा जयस्वाल हा सहावा भारतीय आहे. (Yashasvi Jaiswal 1st Century in ODI)
रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालची 155 धावांची भागीदारी
विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली. दोघांनी 155 धावांची भागीदारी केली. जैस्वालला चालू मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फक्त 40 धावा करता आल्या होत्या. अखेर त्याने संधी साधली आणि तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. जखमी शुभमन गिलच्या अनुपस्थितीत त्याला एकदिवसीय संघात डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली.
गेल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी
यशस्वी जैस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 18 आणि 22 धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने संयम बाळगला आणि 75 चेंडू खेळून अतिशय संथ पद्धतीने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, त्याने आपला वेग वाढवला आणि पुढील 50 धावा 35 चेंडूत पूर्ण केल्या. या सामन्यात जैस्वालने 121 चेंडूत 116 धावांची खेळी केली.
हे ही वाचा -