एक्स्प्लोर

VIDEO : कोहली-गंभीरसारखा राडा! इराणी कपमध्ये दोन भारतीय खेळाडू भिडले, मैदानावर धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Yash Dhull Yash Thakur Clash Irani Cup 2025 : इराणी कप 2025 च्या शेवटच्या दिवशी मैदानावर चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला.

Irani Cup 2025 Yash Dhull Yash Thakur Clash : इराणी कप 2025 च्या शेवटच्या दिवशी मैदानावर चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. विदर्भचा वेगवान गोलंदाज यश ठाकुर आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाचा फलंदाज यश धुल हे भर मैदानात भिडले. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात रणजी विजेता विदर्भने रेस्ट ऑफ इंडियावर 93 धावांनी मात करत विजेतेपद पटकावले.

रविवारी इराणी कपचा शेवटचा दिवस होता. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरशीचा सामना चालू होता. रेस्ट ऑफ इंडियासमोर 361 धावांचे आव्हान होते. मात्र त्यांनी सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या आणि विदर्भने सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर दिल्लीचा फलंदाज यश धुलने मानव सुधारसोबत शतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले आणि विजयाची आशा जिवंत ठेवली.

इराणी कपमध्ये दोन भारतीय खेळाडू भिडले

यश धुल चांगल्या फॉर्मात फलंदाजी करत होता, त्यामुळे विदर्भचे गोलंदाज दबावाखाली आले होते. धुल 116 चेंडूंवर 92 धावा करून खेळत असतानाच, 63व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यश ठाकुरने एक शॉर्ट बॉल टाकला. धुलने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण ते झेलबाद झाला. विकेट मिळाल्यानंतर ठाकुरने उत्साहात जरा जास्तच सेलिब्रेशन केलं.

या सेलिब्रेशनरम्यान यश ठाकुर धुलला काहीतरी म्हटला, त्यावर धुलही भडकला. दोघे एकमेकांकडे धावले आणि क्षणभर वाटले की मारामारी होईल. अंपायरला मध्ये पडून भांडण थांबवावे लागले आणि ठाकुरला दूर नेण्यात आले. मैदानावरचा हा ‘हाय व्होल्टेज’ प्रसंग पाहून प्रेक्षकांना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या जुनी भांडणाची आठवण झाली.

चाहत्यांना झाली कोहली–गंभीर वादाची आठवण

हे पहिल्यांदाच नाही की दोन भारतीय खेळाडू आपापल्या संघासाठी खेळताना भिडले आहेत. आयपीएल 2013 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या दरम्यान मैदानावर तणाव निर्माण झाला होता. कोहली बाद झाल्यानंतर गंभीरने काहीतरी म्हटल्याने कोहली त्याच्याकडे संतापाने धावून गेला होता. दोघे जवळजवळ भिडणार इतक्यात केकेआरचा वरिष्ठ खेळाडू रजत भाटिया मध्ये पडून विषय शांत केला होता. 

विदर्भाने तिसऱ्यांदा जिंकले इराणी कप विजेतेपद 

या सामन्यात विदर्भाने दुसऱ्या डावात शेष भारताला 267 धावांवर गुंडाळले आणि 93 धावांनी विजय मिळवला. यासह विदर्भाने तिसऱ्यांदा इराणी कप विजेतेपद जिंकले. या सामन्यात यश ठाकूरच्या गोलंदाजी कामगिरीत एकूण सहा विकेट्सचा समावेश होता, ज्यामध्ये पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्सचा समावेश होता.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
Rohit Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे

व्हिडीओ

Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट
Maharashtra Hindi vs Marathi : राज्यात पुन्हा पेटणार मराठी हिंदी वाद
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Result : बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
Thalapathy Vijay : सत्तास्थापनेसाठी विजय यांचा दावा, 112 आमदारांचे पत्र; राज्यपाल म्हणाले, आधी 118 आमदारांच्या सह्या दाखवा
सत्तास्थापनेसाठी विजय यांचा दावा, 112 आमदारांचे पत्र; राज्यपाल म्हणाले, आधी 118 आमदारांच्या सह्या दाखवा
साई रिसॉर्टप्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया टाळली, पत्रकाराच्या प्रश्नावर गप्प
साई रिसॉर्टप्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया टाळली, पत्रकाराच्या प्रश्नावर गप्प
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, खड्डा चुकवताना थेट भोगावती नदीत कोसळली; रिक्षाचालक ठार, 1 गंभीर जखमी
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, खड्डा चुकवताना थेट भोगावती नदीत कोसळली; रिक्षाचालक ठार, 1 गंभीर जखमी
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा, राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती खासदार? रिक्त जागेवर कोणाला संधी?
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा, राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती खासदार? उर्वरित टर्मसाठी कोणाला संधी?
Embed widget