WTC Point Table after PAK vs ENG Test : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 अशी गमावणं पाकिस्तानला (PAK vs ENG Test) महागात पडलं आहे. या क्लीन स्वीपमुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल) खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इंग्लंडकडून कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र मालिका एकतर्फी गमावल्यानंतर आता ते थेट सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ते वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्याही खाली पोहोचले आहेत.

अलीकडेच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भारताचा बांगलादेशविरुद्धचा विजय, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव आणि इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्धचा विजय यामुळे गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. या चढ-उतारांमुळे भारतीय संघ (Team India) सध्या WTC गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या मार्गावर आहे.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 9 1 3 120 76.92
2. भारत 7 4 2 87 55.77
3. दक्षिण आफ्रीका 6 5 0 72 54.55
4. श्रीलंका 5 4 1 64 53.33
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 2 56 38.89
8. न्यूझीलंड 2 6 1 28 25.93
9. बांगलादेश 1 9 1 16 12.12

पाकिस्तानला मायदेशात व्हाईट वॉश

कराची (Karachi) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं पाकिस्तानचा (England Beat Pakistan) आठ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. इंग्लंडनं रावळपिंडीत खेळला गेलेला पहिला कसोटी सामना 74 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानला 26 धावांनी धुळ चारत मालिकेवर कब्जा केला. इंग्लंडनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. याशिवाय, पहिल्यांदात पाकिस्तानच्या संघाला घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला आहे.

हे देखील वाचा-