WTC 2025-27 Points Table After West Indies beats Pakistan : वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 90 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी चौथ्या डावात 211 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 120 धावांत गारद झाला. या पराभवानंतरही दोन्ही संघांच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतील स्थानावर कोणताही मोठा बदल झालेला नाही.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सामन्यानंतर गुणतालिका (WTC 2025-27 Points Table)
या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर कायम आहे, तर विजय मिळवूनही वेस्ट इंडिजचा संघ आठव्या स्थानावरच आहे. पाकिस्तानने या चक्रात आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 4 सामने गमावले आहेत. त्यांचा विजयाचा टक्केवारी दर (PCT) सध्या 6.67% इतका घसरला आहे. तर या विजयामुळे वेस्ट इंडिजच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून ती आता 22.73% झाली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत, 7 सामने गमावले आहेत, तर 2 सामने अनिर्णित (Draw) राहिले आहेत.
कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे? (Team India WTC 2025-27 Points Table Update)
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्याचा उर्वरित संघांच्या स्थानांवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत 48.15% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत, 4 गमावले आहेत आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 87.50% च्या उत्कृष्ट विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर मजबूत स्थितीत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 75.00% टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ 72.22% टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तानची लाजीरवाणी कामगिरी (WI vs PAK 1st Test Update)
सामन्याच्या चौथ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांनी अत्यंत लाजीरवाणी कामगिरी केली आणि संपूर्ण संघ अवघ्या 120 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जायडन सील्सने चमकदार कामगिरी करत 14.2 षटकांत अवघ्या 20 धावा देऊन 5 बळी टिपले.
हे ही वाचा -
