WPL Final : आरसीबीनं दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएल स्पर्धा जिंकली आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटनं पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या होत्या. आरसीबीनं 3 बॉल शिल्लक ठेवत आणि 6 विकेटनं विजय मिळवला.  आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधना हिनं 87 धावांची खेळी केली आहे. जॉर्जिया व्हॉल हिनं 79 धावांची खेळी केली. या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं विजेतेपद मिळवलं तर जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सचं  विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. या विजयासह आरसीबीनं चौथ्या पर्वात विजय मिळवला आहे.

डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 203 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी  लिजेली हिनं  37 धावा केल्या. कॅप्टन जेमिमा रॉड्रिक्सनं अर्धशतक केलं. वुलफार्टनं केलेल्या वादळी फलंदाजीमुळं दिल्ली कॅपिटल्सनं 200 धावांचा टप्पा पार केला होता. जेमिमा रॉड्रिग्जनं 57 धावांची खेळी केली. 

दिल्ली चार वेळा फायनलमध्ये, चार वेळा पराभव

डब्ल्यूपीएल ची सुरुवात 2023 पासून झाली आहे. यंदा डब्ल्यूपीएलचा चौथा हंगाम होता. जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सनं सलग चारवेळा अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, त्यांच्या संघाचं विजेतेपदाचं स्वप्न यंदा देखील पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीनं मात्र दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. 

दिल्ली कॅपिटल्सनं डब्ल्यूपीएल सुरु झाल्यापासून सलग चार वेळा अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, त्यांना यंदा देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळं दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपदासाठी आता पुढच्या हंगामात प्रयत्न करावे लागतील. 

आरसीबीनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीला लिजेल ली आणि शफाली वर्मा आली होती. शफाली वर्मा 20 धावा  करुन बाद झाली. लिजेल लीनं तीन षटकार मारत 37 धावा केल्या.

दरम्यान,  डब्ल्यूपीएलच्या चार हंगामात दोनवेळा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजेतेपद पटकावलं आहे.