नवी मुंबई:डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या डब्ल्यूपीएलच्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सबंगळुरुनं मुंबई इंडियन्सला3 विकेटनं पराभूत केलं. अटीतटीच्या लढतीत आरसीबीनं अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये6 विकेटवर154 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाल्यानंतर त्यांची पडझड झाली . त्यानंतर नदीन डी क्लार्कनं नाबाद 63 धावांची खेळी करत बंगळुरुला दमदार विजय मिळवून दिला आहे. आरसीबीनं 20 ओव्हरमध्ये7 विकेटवर157 धावा करत विजय मिळवला.

बंगळुरुचा पहिला विजय

154 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीच्या स्मृती मानधना आणि हॅरिसनं40 धावांची भागीदारी केली. कॅप्टन स्मृती मानधना ही 13बॉलमध्ये18 धावा करुन बाद झाली. ग्रेस हॅरिसनं12 बॉलमध्ये25 धावा करुन बाद झाली. तिने चार चौकार आणि एक षटकार मारला. हेमलता12 बॉलमध्ये7, ऋचा नं 6 बॉलमध्ये6 धावा केल्या. राधा केवळ 1 रनकरुन बाद झाली. अरुंधती रेड्डी यांनी 25बॉलमध्ये20 धावा करन बाद झाली. श्रेयंकापाटीलनं एक रन केली.

मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये6 विकेट गमावून 154 धावा केल्या. मुंबईकडून सजना हिनं45 धावा केल्या. आरसीबीसाठीनदीन डी क्लार्कनं तीन विकेट घेतल्या. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात संथगतीनं झाली. मुंबईनं पाचव्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. अमेलिया केर हिनं15 बॉलमध्ये4 धावा केल्या. कमलिनी 32 धावा करुन बाद झाली. हरमनप्रीतकौरहिनं17 बॉलमध्ये20 धावा केल्या. त्यानंतर सजना हिनं25 बॉलमध्ये45 धावा केल्या. निकोलाकैरीनं29 बॉलमध्ये40 धावा केल्या.

अखेरच्या बॉलवरबंगळुरुचा विजय

बंगळुरुला अखेरच्या दोन ओव्हरमध्ये29 धावा करायच्या होत्या.18 ओव्हरमध्येआरसीबीनं7 विकेटवर126 धावा केल्या. आरसीबीनं19 व्याओव्हरमध्ये11 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्येआरसीबीला6 बॉलमध्ये18 धावा हव्या होत्या. नदीन डी क्लार्कनं अखेरच्याओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि बंगळुरुला विजय मिळवून दिला. 20 व्याओव्हरमध्येबंगळुरुला18 धावा हव्या होत्या. पहिल्या दोन बॉलवरबंगळुरुला एकही रन काढता आली नाही. त्यानंतर नदीन डी क्लार्कनंषटकार चौकार षटकार चौकार मारत 20 धावा करत बंगळुरुला विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्स वरील या विजयासह रॉयल चॅलेंजर्सबंगळुरुनंडब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, स्मृती मानधनाच्या बंगळुरुनं चौथ्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे.