WPL 2026 Eliminator Schedule Update : महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील अखेरचा लीग टप्प्यातील सामना 1 फेब्रुवारी रोजी यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 5 विकेट्सने विजय मिळवत एलिमिनेटर फेरीत आपले स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सची टीम 8 विकेट्स गमावत केवळ 122 धावा करू शकली. 123 धावांचे आव्हान दिल्लीने 18.4 षटकांत सहज पूर्ण केले. या सामन्यानंतर एलिमिनेटरमध्ये कोणत्या संघांमध्ये लढत होणार, हेही स्पष्ट झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स एलिमिनेटर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यापूर्वीच थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर गुजरात जायंट्स संघानेही एलिमिनेटरमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. आता एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 3 फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर 5 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना रंगणार असून, फायनलमध्ये RCBचा सामना एलिमिनेटर विजेत्या संघाशी होईल.
डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स बाहेर (WPL 2026 Mumbai Indians OUT)
या सामन्यासह डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांचा महिला प्रीमियर लीग 2026 मधील प्रवास संपुष्टात आला. मुंबई इंडियन्सने या हंगामात 8 पैकी केवळ 3 सामने जिंकले, तर 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. 6 गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. तर यूपी वॉरियर्स संघाला 8 पैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवता आला, तर 6 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 4 गुणांसह यूपी वॉरियर्सचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला.
मुंबईने दोन वेळा पटकावले विजेतेपद
महिला प्रीमियर लीगचा हा चौथा हंगाम आहे. या लीगची सुरुवात 2023 मध्ये झाली होती. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली, तर 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने खिताबावर आपले नाव कोरले. आता 2026 मध्ये कोणता संघ विजेता ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -
