Continues below advertisement

नवी दिल्ली : विमेन्स प्रीमिअर लीग 2026 च्या ऑक्शनची सुरुवात मार्की प्लेअर्सपासून झाली. या कॅटेगरीत 8 खेळाडू होते. आठ पैकी 7 खेळाडूंना ऑक्शनमध्ये बोली लावत संघांनी खरेदी केलं. तर, ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली अनसोल्ड राहिली. भारताची दमदार खेळाडू दीप्ती शर्माला ऑक्शनमध्ये सर्वाधिक रक्कम मिळाली. यूपी वॉरिअर्सनं तिच्यासाठी आरटीएम कार्डचा वापर केला. दीप्ती शर्माला ऑक्शनमध्ये सर्वाधिक रक्कम मिळाली.

दीप्ती शर्मानं देखील पुन्हा एकदा यूपी वॉरिअर्स सोबत खेळायला मिळणार असल्यानं आनंद व्यक्त केला. जिओ हॉटस्टारवर बोलताना ती म्हणाली की खूप चांगलं वाटतंय, मी उत्तर प्रदेशची असल्यानं या संघासोबत माझं नातं आहे. इथलं मॅनेजमेंट चांगलं असून सहकार्य करतं. डब्ल्यूपीएलमुळं माझी कामगिरी सुधारण्यास मदत झाली असल्याचं दीप्ती शर्मा म्हणाली.

Continues below advertisement

Deepti Sharma : दिल्लीनं बोली लावली, यूपीनं RTM कार्ड वापरलं

दीप्ती शर्माचं नाव डब्ल्यूपीएल 2026 च्या ऑक्शन लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर होतं. तिच्या अगोदर एलिसा हिली अनसोल्ड राहिली. हिली अनसोल्ड सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं होतं. त्यानंतर दीप्ती शर्मावर देखील बराचवेळ कोणी बोली लावली नाही. शेवटी दिल्लीनं तिच्यावर बेस प्राइसवर बोली लावली. पुन्हा कोणीच बोली न लावल्यानं दीप्ती शर्मा दिल्ली कडे जाणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेश वॉरिअर्सनं आरटीएमचा वापर केला. दिल्लीनं शेवटची प्राईस 3 कोटी 20 लाख सांगितली. यूपीनं आरटीएम कार्डचा वापर करत दीप्तीला खरेदी केलं.

मार्की राऊंडमध्ये कोणावर किती बोली लागली?

सोफी डिवाइन- 2 कोटी (गुजरात जायंट्स)

दीप्ति शर्मा- 3.2 कोटी (यूपी वॉरिर्स)

एमेलिया केर- 3 कोटी (मुंबई इंडियंस)

रेणुका सिंग- 60 लाख (गुजरात जायंट्स)

सोफी एक्लेस्टन- 85 लाख (यूपी वॉरिर्स )

मेग निंग- 1.9 कोटी (यूपी वॉरिर्स )

लौरा वोल्वार्ड्ट- 1.1 कोटी (दिल्ली पिटल्स)

मार्की राउंडमध्ये यूपी वॉरिअर्सनं तीन खेळाडूंना खरेदी केलं. यामध्ये दीप्ती शर्मा 3 कोटी 20 लाख रुपये, सोफी एक्लेस्टन 85 लाख रुपये, मेग लॅनिंगला 1 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. याच राऊंडमध्ये गुजरात जायंटसनं 2 खेळाडूंना म्हणजेच सोफी डिवाईन आणि रेणुका सिंगला संघाचा भाग बनवलं.

दरम्यान, दीप्ती शर्मानं नुकत्याच पार पडलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता. भारतानं पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता त्यात दीप्तीची कामगिरी महत्त्वाची राहिली होती.