Mohammad Hafeez : विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरोधात शानदार शतक ठोकत क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाची बरोबरी केली. विराट कोहलीने कोलकात्यात सचिनच्या वनडेतील 49 शतकांची बरोबरी केली. संथ खेळपट्टीवर विराट कोहलीने शतक ठोकले, पण पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने वादग्रस्त वक्तव केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीज याने विराट कोहली सेल्फिश असल्याचे वक्तव्य केलेय. विराट कोहली सेल्फिश आहे. तो फक्त शतकासाठीच खेळतो, असे वक्तव्य केले. विराट कोहलीने कोलकात्याच्या संथ खेळपट्टीवर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर थांबत शतक ठोकले, त्यासोबत भारताची धावसंख्याही 300 पार नेली, त्या विराट कोहलीचे सर्वच स्तरावर कौतुक झाले. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही सामन्यानंतर विराट कोहलीच्या डावाचे कौतुक केले. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज बराळला. विराट कोहली सेल्फिश क्रिकेट आहे. तो फक्त शतकासाठीच खेळतो. रोहित शर्मा निस्वार्थीपणे संघासाठी खेळतो, असे हाफिज म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीची दोन शतके हुकली होती. 95, 88 धावांवर विराट कोहली बाद झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. वाढदिवसाच्या दिवशी विराट कोहलीने आफ्रिकेविरोधात थोडी संथ खेळी केली. शतकाच्या जवळ आल्यानंतर त्याने एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. त्याने शतक ठोकत सचिनच्या शतकांची बरोबरी केली. त्यावरुनच हाफिज याने विराट कोहलीवर निशाणा साधला. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर टॉप क्रिकेट अॅनालिसिसच्या शोमध्ये मोहम्मद हाफिजने विराट कोहली सेल्फिश असल्याचे म्हटले. विश्वचषकात तिसऱ्यांदा विराटमध्ये स्वार्थीपणा दिसल्याचे हाफिज म्हणाला. यावेळी त्याने कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
मोहम्मद हाफिज याच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी समचार घेतलाय. त्याशिवाय माजी खेळाडूंनीही त्याला सुनावलेय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेकंटेश प्रसाद यानेही हाफिज याच्यावर टीका केली. त्याशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्या खास शैलीत हाफिजची फिरकी घेतली आहे. हाफिजचे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरलाय.