एक्स्प्लोर

Mitchell Marsh: हातात बिअर आणि विश्वचषकावर पाय;मिचेल मार्शच्या लज्जास्पद कृत्यामुळे चाहते संतापले

World Cup Trophy: यंदाच्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलं. पण यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई : विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने (Australia) विश्वविजेत्या पदावर नाव कोरलं. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामन्याची लढत झाली. पण ज्या विश्वचषकासाठी सारा अट्टाहास सुरु केला होता, त्या विश्वचषकाचा अपमान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केला असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.  ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस (PatCumins) याने मिचेल मार्शचा एक फोटो सोशल मीडिया हँन्डलवरुन शेअर केला. त्याच फोटोनंतर क्रिकेट फॅन्समधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. या फोटोमध्ये मिचेल मार्श (mitchell marsh) हा विश्वचषकावर पाय ठेवून बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. 

पॅट कमिंस याने शेअर केलेल्या या फोटोमुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये बराच रोष पाहायला मिळाला. तसेच चाहत्यांकडून सचिनचा विश्वचषकासोबत देखील फोटो शेअर करण्यात आलाय. ज्याची तुलना मार्शच्या या फोटोसोबत केली जातेय. सचिनने या फोटोमध्ये विश्वचषकाच्या ट्रॉफीला जवळ घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पंरतु मिचेल मार्शकडून मात्र या ट्रॉफीचा अपमान झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. त्याच्या एका हातामध्ये बियर आणि त्याचे दोन्ही पाय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर या फोटोमध्ये आहेत. 

मिचेलच्या फोटोवर चाहत्यांचा संताप

विश्वचषकाची ट्रॉफी सहाव्यांदा उचलल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ट्रॉफीला जवळ घेत फोटो शेअर केले. पण मिचेल मार्शच्या या फोटोने मात्र ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये. ऑस्ट्रेलियाने 2023 चा विश्वचषक जिंकला.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शच्या हातात बिअर  आणि त्याचे पाय विश्वचषकावर आहेत. मिचेल मार्शच्या या लज्जास्पद कृत्यामुळे क्रिकेट चाहते संतापले होते. मिचेल मार्शवर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर टीका केली.

विश्वचषकाचा अंतिम सामना

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली.  भारताकडून रोहित शर्माने 47 धावांची शानदार खेळी केली. रोहितची खेळी पाहता भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण हे होऊ शकले नाही. रोहितचा अप्रतिम झेल ट्रॅव्हिस हेडने घेतला आणि सामना बदलला. कोहलीने 54 धावांची खेळी खेळली असली तरी त्याची अर्धशतकी खेळी मोठ्या सामन्यात फार काही करू शकली नाही.

याशिवाय केएल राहुलने 66 धावांची खेळी केली, भारताने 240 धावा केल्या होत्या. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने डावाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या 3 विकेट लवकर पडल्या पण यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन यांनी 192 धावांची भागीदारी करून भारताला सामन्यातून बाहेर काढले. भारताने हा सामना 6 विकेटने गमावला. ट्रॅव्हिस हेडला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

हेही वाचा : 

ICC Playing XI Of World Cup : ICC कडून वर्ल्ड कपचा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर; टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा समावेश, रोहित कर्णधार

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri On Team India T20 Captain: श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या नव्हे...; टीम इंडियाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी एकच नाव सांगितलं!
श्रेयस, हार्दिक नव्हे...; टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी नाव सांगितलं!
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
IPL Playoffs Qualification Scenarios 2026: मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
Virat Kohli And Manish Pandey RCB vs KKR IPL 2026: अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Sunil Tatkare and Praful Patel: 'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Embed widget