SL vs BAN, World Cup 2023 : दिल्लीमध्ये बांगलादेशविरोधात (SL vs BAN) अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाइम आऊटमुळे (timed out) अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला बाद देण्यात आले. सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) खेळण्यासाठी मैदानात आला. स्ट्राईक घेतली, पण हेल्मेटचा भाग तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. यासाठी दोन मनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने पंचाकडे बादची दाद मागीतली. क्रिकेटच्या नियमांनुसार, कोणत्या फलंदाजाला दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घ्यावी लागते. पण हेल्मेट नसल्यामुळे मॅथ्यूजला स्ट्राईक घेता आली नाही. शाकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी बाद दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झाल्यानंतर बाद देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी असे बाद कुणालाही दिले नव्हते. 


अँजलो मॅथ्यूजला बाद दिल्यानंतर सोशल मीडियवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. समालोचकांनीही हे खिलाडूवृत्ती नसल्याची प्रतिक्रिया दिली. मॅथ्यूजने जाणूनबुजून उशीर केला नव्हता. त्यामुळे शाकीबने आपली अपील माघारी घ्यायला हवी होती, असे समालोचकांनी म्हटलेय.  सोशल मीडियावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या समर्थकांमध्ये राडा सुरु झालाय. दोन्ही देशांचे समर्थक भीडले आहेत.






नियम काय सांगतो ?


विकेट पडल्यानंतर फलंजाजाला दोन मिनिटांत (१२० सेकंद) स्ट्राईक घ्यावी लागते. जर वेळेवर स्ट्राईक घेतली नाही तर प्रतिस्पर्धी खेळाडू बादची पंचाकडे दाद मागू शकतात. शाकीबनेही पंचाकडे दाद मागितली. त्यानंतर एकही चेंडू न खेळता, धाव न काढता... मैदानावर येऊन मॅथ्यूजला बाद दिले. 






नेमकं काय झाले... 


सदर समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँझलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने फलंदाजीसाठी स्ट्राईक घेतली. पण स्ट्राईक घेत असताना हेल्मेट खराब झाले. त्यामुळे मॅथ्यूजने दुसरे हेल्मेट मागवले. पण या सर्व घटनेला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे शाकीबने पंचाकडे आऊटची दाद मागितली. त्यानंतर मैदानावर थोडावेळ राडा झाला. अँजलो मॅथ्यूजने शाकीबकडे अपील खरेच केली का? असा सवालही केला. पंचाशी बातचीतही केली. पण नियमांनुसार, पंचांनी मॅथ्यूजला बाद दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी टाईमआऊट झाल्यामुळे कुणालाही बाद दिलेले नाही. अँजलो मॅथ्यूज असा बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरलाय.