Shakib Al Hasan IND vs BAN : पुण्यात भारताविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन दुखापतीमुळे हैराण झाला आहे. शाकीब अल हसन दुखापतीमधून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे विश्वचषकातील भारताचा पुण्यातील पेपर आणखी सोपा झालाय, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. शाकीब अल हसन भारताविरोधात हमखास खेळतोच. गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय तो आता नेतृत्वही करत आहे. शाकीब अल हसन याच्याकडे दाडंगा अनुभव आहे. शाकीबच्या अनुपस्थितीत बांगलादेशचा संघ कमकुवत जाणवत आहे. 


बांगलादेश संघाचा फिजिओ डॉक्टर खालिद महमूद याने शाकीब तंदुरुस्त होत असल्याची माहिती दिली आहे. शाकीबच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. भारताविरोधात खेळण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करत आहे. पुण्यातील सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशीच त्याच्या फिटनेसबाबत निर्णय घेतला जाईल. 
 
शाकीब अल हसन याला चेन्नईमध्ये न्यूझीलंडविरोधात खेळताना दुखापत झाली होती. फलंदाजी करताना शाकीब जायबंदी झाला होता. धाव घेण्यासाठी खेळपट्टवर धावाताना त्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही शाकीबने 10 षटके गोलंदाजी केली होती. शाकीब मैदानावर खेळत होता, पण दुखापतीमुळे त्याला त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. शाकीबची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय. त्यामुळे बांगलादेशच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक वृत्त आहे. पण सामन्याच्या दिवशीच त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 


क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बांगलादेशचा डॉक्टर खालिद महमूद म्हणाले की, शाकिबला आता पहिल्यापेक्षा बरे वाटत असून कोणतीही वेदना नाही. मात्र सरावासाठी  आल्यावरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. तो भारताविरुद्ध मैदानात उतरेल, अशी आशा आहे. त्याचे स्कॅनिंग केले जाईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 














चेन्नईमध्ये बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात शाकीबने 51 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली होती. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकार मारले होते.  शाकीबने 10 षटकात 54 धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. शाकीबने न्यूझीलंडच्या कॉनवेला तंबूत पाठवले होते. या सामन्यात फलंदाजी करताना शाकीब जायबंदी झाला होता.