AUS vs PAK, World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली आहे. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तूटून पडले होते. बेंगळुरु येथील मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. वॉर्नर आणि मार्श यांचे पाकिस्तानकडे कोणतेही उत्तर दिसले नाही. त्यातच पाकिस्तानच्या फिल्डर्सनी डेविड वॉर्नरचे झेल सोडले. याचा वॉर्नरने फायदा घेतला.. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी द्विशतकी भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच काय तो निर्णय पाकिस्तानच्या बाजूने होता. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक गोलंदाजीचा समाचार घेतला. 33.5 षटकानंतर ऑस्ट्रेलियाने 259 धावांचा पाऊस पाडला आहे. वॉर्नरने 95 चेंडूत 124 धावांचा पाऊस पाडला. तर मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावा चोपल्या आहेत. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्यापुढे पाकिस्तानची गोलंदाजी दुबळी जाणवत होती.
डेविड वॉर्नरचे वादळ -
मागील तीन सामन्यात मोठी खेळी करु न शकणाऱ्या वॉर्नरने आज पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. डेविड वॉर्नर याने पाकिस्तानचा समाचार घेतला. वॉर्नरने 96 चेंडूत 124 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सात षटकार आणि 11 चौकार लगवाले आहेत. डेविड वॉर्नर याने एकापाठोपाठ एक चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंगनेही मदत केली. वॉर्नरचे दोन झेल सोडले.
मिचेल मार्शचे झंझावती शतक -
ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामी फलंदाज मिचेल मार्श यानेही पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. मार्श याने पहिल्या चेंडूपासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंगनेही मदत केली. मार्श याने 9 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावांची खेळी केली.
प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत ?
ऑस्ट्रेलियाचे 11 शिलेदार : डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, पैट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, एडम जाम्पा, जोश हेजलवुड
पाकिस्तानचे 11 शिलेदार : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन अफरीदी, हॅरिस रऊफ