Rishabh Pant Health Update : टीम इंडिया (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली. पण या दोन्ही संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही, अन् चर्चांना उधाण आलं, त्यातच आता पंतचा भीषण अपघात झाल्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे, तो पुन्हा मैदानावर परतेल का? अशा एक न अनेक प्रश्नांनी क्रिकेट चाहत्यांना सतावलं आहे...
तर भारतीय संघाचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आज आयुष्यातील सर्वात मोठा सामना खेळतोय. त्याचा हा सामना आहे नियतीशी...अगदी कालपर्यंत पंत दिल्लीत होता. त्यानं ख्रिसमसचं सेलिब्रेशनही महेंद्रसिंह धोनीच्या घरी केलं. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वन डे मालिकेतून त्याला विश्रांती मिळाल्यानं नवीन वर्षाचं स्वागत आपल्या कुटुंबियांसोबत करण्यासाठी तो दिल्लीतून रुरकीकडे निघाला होता. पण याच दरम्यान पंतचा अपघात झाला आणि त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण क्रिकेट जग हादरुन गेलं. सर्व देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. समोर आलेल्याा माहितीनुसार पंतची प्रकृती स्थिर असली तरी जखमा गंभीर असल्याने त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात आलं आहे... बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंतला कपाळ, उजव्या गुडघ्याचे लिगामेंट, मनगटासह घोटा आणि पाठीला जखम झाली आहे. दरम्यान मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण एका खेळाडूच्या गुडघ्याला खासकरुन लिगामेंटला जखम होण गंभीर आहे, कारण लिगामेंटच गुडघ्यांना मजबूत ठेवते. गुडघ्यांच्या दुखण्यात यामुळे आधार मिळतो. पण लिगामेंटला दुखापत झाल्याने पंतला भविष्यात खेळायला अडचण येऊ शकते. पण त्याची जखम किती गंभीर आहे हे एमआरआय झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, त्यामुळे तूर्तास तरी सर्वजण प्रार्थना करत असून पंत लवकरच मैदानात पुन्हा उतरेल अशी आशा व्यक्त करत आहेत.
कसोटीतील फॉर्म कायम
मागील काही काळापासून मर्यादीत षटकांमध्ये खास कामगिरी करु न शकलेला पंत कसोटीत मात्र फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतनं निर्णायक खेळी केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्यानं केलेल्या 93 धावा भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
पंतची दमदार कामगिरी
सामने | डाव | धावा |
कसोटी | 33 | 2271 |
एकदिवसीय | 30 | 865 |
टी20 | 66 | 987 |
आयपीएल | 98 | 2838 |
हे देखील वाचा-