South Africa vs West Indies, T20 Match : रविवारी रात्री (26 मार्च) दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात अनेक रेकॉर्ड्स मोडले गेले. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 258 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग करून सामना जिंकला. या सामन्यात ज्या प्रकारे चौकार-षटकारांचा पाऊस पडला, त्यामुळे टी-20 क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड अक्षरश: उद्ध्वस्त झाले. तर टी20 क्रिकेटमधील मोडलेल्या काही विक्रमांवर नजर फिरवू...



  • दक्षिण आफ्रिका आता T20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या लक्ष्याचा (259) पाठलाग करणारा संघ बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या (244) नावावर होता.

  • या सामन्यात एकूण 517 धावा झाल्या. हा सामना आता T20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा सामना बनला आहे. यापूर्वी, PSL 2023 मध्ये मुलतान सुलतान्स विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात 515 धावा झाल्या होत्या.

  • दक्षिण आफ्रिकेने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या (259) केली. यापूर्वी या फॉरमॅटमध्ये या संघाने सर्वाधिक 241 धावा केल्या होत्या.

  • या सामन्यात वेस्ट इंडिजनेही त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या 258 धावांच्या रुपात केली. याआधी विंडीज संघाने टी-20 मध्ये सर्वाधिक धावा 245 केल्या होत्या.

  • हा सामना सर्वाधिक चौकारांचा (81) सामना ठरला. यापूर्वी, पीएसएल 2023 मध्ये मुलतान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात 78 चौकारांचा समावेश होता.

  • या सामन्यात एकूण 35 षटकार मारले गेले, जे टी-20 सामन्यातील सर्वाधिक आहे. यापूर्वी बल्गेरिया आणि सर्बिया यांच्यातील सामन्यात 33 षटकार मारले गेले होते.

  • या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी 22 षटकार ठोकले. हा विक्रम एका संघाने टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 22 षटकार मारले होते.

  • या सामन्यात क्विंटन डिकॉकने अवघ्या 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात जलद 50 धावा करण्याचा स्वतःचा विक्रम (17 चेंडू) मोडला.

  • दक्षिण आफ्रिकेने 5.3 षटकात 100 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पूर्ण सदस्य देशांमध्ये ही सर्वात जलद 100 धावा होती.

  • वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे संयुक्त चौथे सर्वात वेगवान शतक आहे.


हे देखील वाचा-