Why Was Tim David Penalised By BCCI : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम येथे रविवारी खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगला. मात्र, या थरारक सामन्यानंतर आता एका वादग्रस्त घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात संघाचा ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम डेव्हिडची एक अश्लील हातवारा कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.
टीम डेव्हिडला अखेर शिक्षा मिळाली!
सामन्यातील अत्यंत तणावपूर्ण क्षणी सर्वांचे लक्ष मैदानावरील खेळाकडे असताना कॅमेरा आरसीबीच्या डगआउटकडे वळला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या टीम डेव्हिडने मिडल फिंगर दाखवल्याचे दृश्य थेट प्रसारणात झळकले. काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि क्रिकेटविश्वात मोठा वाद निर्माण झाला.
बीसीसीआयची कडक कारवाई
सामना रेफरी आणि आयपीएल व्यवस्थापनाने या प्रकाराला शिस्तभंगाचे गंभीर प्रकरण मानले. आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी टिम डेविड दोषी आढळला असून, त्याच्यावर मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात 2 डिमेरिट पॉइंट्सची भर घालण्यात आली आहे. नियमांनुसार ठराविक डिमेरिट पॉइंट्स पूर्ण झाल्यास खेळाडूवर एक किंवा अधिक सामन्यांची बंदीही लागू शकते.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना वाढला तणाव?
विशेष म्हणजे, टीम डेव्हिड यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. रायपूरमध्ये आपल्या माजी संघाविरुद्ध खेळताना तो दबावाखाली दिसत होता. त्याने हा इशारा नेमका कोणाला उद्देशून केला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, डगआउटसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन हे खेळभावनेला धरून नसल्याची टीका होत आहे.
या वादामुळे मैदानावरील थरारक सामन्याची चमक काहीशी फिकी पडली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 2 विकेट्सनी पराभव केला. कृणाल पांड्या याच्या 73 धावांच्या दमदार खेळीने चाहत्यांची मने जिंकली, पण टिमच्या या वर्तनामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेड कोच फ्लॉवरवर पण कारवाई
बंगळुरूचा हेड कोच अँडी फ्लॉवरला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शिवीगाळ केल्याप्रकरणी बीसीसीआयने शिक्षा ठोठावली आहे. सामन्यादरम्यान चौथ्या पंचांसोबत वाद घालताना फ्लॉवर शिवीगाळ करताना ऐकू आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीआयने त्याच्या मॅच फीमधून 15 टक्के रक्कम कापली असून, आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.हे ही वाचा -
