Shubman Gill Retired hurt IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. त्यानंतर भारताची पहिल्या डावात फलंदाजी सुरू आहे. दरम्यान संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल फक्त चार धावांच्या वैयक्तिक धावसंख्येसह रिटायर्ड हर्ट झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) खेळाच्या पहिल्या सत्रात घडली. भारतीय डावाच्या 35 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरची विकेट पडली, सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर एडेन मार्करामने त्याला झेलबाद केले.

Continues below advertisement




मैदानात नेमकं काय घडलं?


शुभमन गिलने त्याच्या इनिंगच्या तिसऱ्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर हार्मरला चौकार मारला. पण त्यानंतर लगेचच तिने मान पकडली. मग टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले आणि गिलची तपासणी केली. स्थिती पाहता त्यांनी गिलला तत्काळ मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. पवेलियनकडे परतताना तो किती वेदनेत दिसत होता, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.




शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?


रिटायर्ड हर्ट होताना गिल 3 चेंडूत 4 धावा करून खेळत होता. आशा आहे की शुभमन गिलची दुखापत गंभीर नाही आणि तो या सामन्यात पुन्हा फलंदाजी करू शकेल. शुभमन मैदानाबाहेर पडल्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. प्रेक्षकांनी त्याच्या पुनरागमनाचे कौतुक केले. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर ऋषभ भारतीय संघात परतला आहे.


दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. लंचपर्यंत भारताने पहिल्या डावात 4 बाद 138 धावा केल्या असून तो दक्षिण आफ्रिकेपेक्षा फक्त 21 धावांनी मागे आहे. सध्या रवींद्र जडेजा 11 आणि ध्रुव जुरेल 5 धावांवर खेळत आहेत. पहिल्या सत्रात भारताने वॉशिंग्टन सुंदर, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांचे विकेट गमावले. याशिवाय, कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेले आहेत, ही टीमसाठी मोठी चिंता आहे.




हे ही वाचा - 


शिक्कामोर्तब! संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत; 'थलपति' जडेजाला CSK चा गुडबाय, कमी पैशात राजस्थानने विकत घेतलं, किती कोटी रुपयांमध्ये झाली डील?