Jay Shah Handshake Pakistan Captain Fatima Sana : महिला टी-20 विश्वचषक 2026 सुरू होण्यापूर्वी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये जय शाह पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना (Fatima Sana) हिच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Continues below advertisement

आयसीसी अध्यक्ष म्हणून पार पाडली अधिकृत जबाबदारी... (Jay Shah Handshake Pakistan Captain Fatima Sana)

या संपूर्ण प्रकरणामागे कोणताही राजकीय किंवा वादग्रस्त संदर्भ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जय शाह सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) अध्यक्ष आहेत. महिला टी-20 विश्वचषकाच्या अधिकृत कार्यक्रमादरम्यान सहभागी सर्व संघांच्या कर्णधारांचे स्वागत करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. याच कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिची भेट घेत हस्तांदोलन केले. म्हणूनच हा प्रसंग केवळ अधिकृत प्रोटोकॉलचा भाग होता. मात्र भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांच्या पार्श्वभूमीवर या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Continues below advertisement

सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

जय शाह आणि फातिमा सना यांच्या हस्तांदोलनाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला. काहींनी याला आयसीसीच्या औपचारिक कार्यक्रमातील सामान्य शिष्टाचार म्हटले, तर काहींनी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये गेल्या काही काळात हस्तांदोलन होत नसताना हा फोटो विशेष चर्चेचा विषय का ठरला, असा प्रश्न उपस्थित केला. याच कारणामुळे हा फोटो काही तासांतच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.

भारत-पाकिस्तानमध्ये ‘नो हँडशेक’ चर्चेत कधी आला? (No  Handshake India vs Pakistan)

भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्याची बाब 2025 पासून अधिक चर्चेत आली. आशिया चषक 2025 दरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर महिला वनडे विश्वचषक 2025 आणि पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धांमध्येही दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलनाचे प्रसंग फारसे दिसले नाहीत. याच पार्श्वभूमीवर जय शाह यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

महिला टी-20 विश्वचषकासाठी रंगली तयारी (Women's T20 World Cup Team India)

यंदाच्या महिला टी-20 विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड येथे होत असून सर्व संघांनी अंतिम तयारीला वेग दिला आहे. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला मोहिमेचा शुभारंभ 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर भारताचे सामने आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणार आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदा विश्वविजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार असून भारत-पाकिस्तान लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात एन्ट्री होताच वैभवला दादाचा थेट इशारा; गांगुलीचे शब्द ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय काय म्हणाला?