Rohit Sharma on Mohammed Shami : टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. भारतीय संघाच्या या दौऱ्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की मोहम्मद शमी या मालिकेत पुनरागमन करणार की नाही? यावर आता रोहित शर्माने उत्तर दिले आहे.  


मोहम्मद शमी शेवटचा गेल्या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता. तेव्हापासून तो घोट्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होत आहे. हिटमॅन म्हणाला- प्रामाणिकपणे सांगायचे तर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी त्याची निवड करणे कठीण आहे. त्याला आणखी एक दुखापत झाली आणि त्याचा गुडघा सुजला आहे. यामुळे त्याला पुन्हा सुरुवात करावी लागली. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगळुरू येथे डॉक्टर आणि फिजिओसह आहे. आम्ही अनफिट शमीला ऑस्ट्रेलियात घेऊन जाऊ इच्छित नाही. तो 100 टक्के तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे.




काय म्हणाला शमी?


जेव्हा शमी पुन्हा जखमी झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती, तेव्हा शमीने लिहिले होते की, अशा अफवा का पसरवल्या जात आहेत आणि मी बरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय आणि मी बॉर्डर-गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे म्हटलेले नाही. शमीने चाहत्यांना अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले होते. पण प्रश्न असा आहे की जर ती बातमी चुकीची होती तर मग रोहित शर्माचे हे विधानही चुकीचे आहे का? कर्णधार आपल्या खेळाडूबद्दल खोटे बोलत आहे का? आता या बातमीवर शमी काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


शमीला कधी झाली दुखापत?


मोहम्मद शमी 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान जखमी झाला होता. वर्ल्ड कप फायनलनंतर शमीने एकही सामना खेळलेला नाही. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आणि आता जेव्हा त्याच्यावर मैदानात परतण्याची वेळ आली तेव्हा त्याला पुन्हा दुखापत झाल्याच्या बातम्या येत आहेत. शमी सावरला तर टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही, पण हा खेळाडू बाहेर झाला तर भारतीय संघासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.


हे ही वाचा -


Ind vs Nz 1st Test : बेंगळुरूमधून मोठी अपडेट; भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी संकटात! सामना होणार रद्द, काय आहे कारण