IND Vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारतानं दोन सामन्यांची (India vs Bangladesh) कसोटी मालिका जिंकली. पण भारताच्या विजयानंतर संघाच्या बॅटींग लाईन अपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) अगोदर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी का पाठवलं गेलं? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचं उपकर्णधाराची भूमिका साकारणाऱ्या चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) मात्र या प्रश्नावरून पडदा हटवला आहे.
विराट आधी अक्षरला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाचा असल्याचं पुजारानं सांगितलं. पुजारा म्हणाला की, "तिसऱ्या दिवशी परिस्थिती खूपच कठीण झाली होती. बांगलादेशच्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी संघर्ष करताना दिसत होते. परिस्थिती अशी होती की, डावखुरा फलंदाज फिरकी गोलंदाजाला अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकतो असं संघ व्यवस्थापनाला वाटलं. त्यामुळं विराट कोहलीऐवजी अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं."
संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर सुनील गावस्कर काय म्हणाले?
संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा विराट कोहलीच्या निर्णयावर परिणाम झाला असेल, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं. परंतु, भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तज्ज्ञांच्या मतावर आपली प्रतिक्रिया दिली. गावसकर म्हणाले की, “या संदेशामुळं कोहलीवर फारसा परिणाम झाला नसावा. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. जर विराट कोहलीनं स्वतः अक्षरला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलं असेल तर काही हरकत नाही. पण हा निर्णय त्याचा नव्हता तर ते समजण्यापलीकडचं आहे. काय झाले ते आम्हाला माहीत नाही. मात्र हा निर्णय समजू शकत नाही. अक्षर पटेलनं चांगली फलंदाजी केली असली तरी."
विराट कोहलीची खराब कामगिरी सुरूच
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही. बांगलादेशविरुद्ध त्याच्याकडून शतक अपेक्षित होतं. पण असं झालं नाही. विराट कोहलीनं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील आपला फॉर्म गवसलाय.
विराट कोहलीची कारकिर्द
क्रिकेट | सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | सरासरी | स्ट्राईक रेट | शतक | अर्धशतक | झेल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 104 | 177 | 8119 | 254* | 48.90 | 55.50 | 27 | 28 | 104 |
एकदिवसीय | 265 | 256 | 12471 | 183 | 57.47 | 93.01 | 44 | 64 | 139 |
टी-20 | 115 | 107 | 4008 | 122* | 52.73 | 137.96 | 1 | 37 | 50 |
हे देखील वाचा-