Who is Vanshika Chadha Meet Kuldeep Yadav wife : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव आपल्या बालमैत्रीण वंशिका चड्ढा हिच्यासोबत 14 मार्च रोजी मसुरी येथे विवाहबंधनात अडकणार आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता कुलदीपच्या आयुष्यातील हा आणखी एक खास क्षण आहे. दोघांनी 4 जून 2025 रोजी साखरपुडा केला होता. कुलदीप आणि वंशिका एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.

Continues below advertisement

वंशिका चड्ढा कोण आहेत? (Who is Vanshika Chadha)

Continues below advertisement

वंशिका चड्ढा ही भारतातील प्रतिष्ठित वित्तीय संस्थेत म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ती प्रशासनिक किंवा व्यवस्थापकीय पदावर काम करत आहे. वंशिकाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे उच्च शिक्षण घेतले. कुलदीप यादव क्रिकेटमुळे नेहमीच चर्चेत असतात, तर वंशिका मात्र लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. तिचे वैयक्तिक आयुष्य फारसे सार्वजनिक नाही. 

लग्न कुठे होणार?

कुलदीप आणि वंशिकाच्या लग्नसोहळ्याला 13 मार्चपासून सुरुवात झाली. पारंपरिक हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमांनी प्री-वेडिंग सेलिब्रेशन रंगले. दोघांचा विवाह 14 मार्च रोजी उत्तराखंडमधील सुंदर डोंगराळ पर्यटनस्थळ मसूरी येथील ऐतिहासिक हॉटेल सॅवॉय, मसुरी मध्ये पार पडणार आहे. या भव्य समारंभासाठी भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होऊ शकतात.

हे ही वाचा -  

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ