Most Times Reaching IPL Playoffs : आयपीएल 2026 चे 62 सामने पूर्ण झाले असून आता लीग टप्प्यातील फक्त 8 सामने बाकी आहेत. रविवारी, 17 मे रोजी प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ निश्चित झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 11व्यांदा आयपीएल प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांमध्ये पाच वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानावर आहे.
तर मुंबई इंडियन्सनेही पाच वेळा किताब जिंकत 11 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तीन वेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्स देखील टॉप-5 मध्ये आहे. तर सनरायझर्स हैदराबाद या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचलेले संघ
12 वेळा – चेन्नई सुपर किंग्स11 वेळा – मुंबई इंडियन्स11 वेळा – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर8 वेळा – कोलकाता नाइट रायडर्स7 वेळा – सनरायझर्स हैदराबाद6 वेळा – दिल्ली कॅपिटल्स6 वेळा – राजस्थान रॉयल्स3 वेळा – पंजाब किंग्स3 वेळा – गुजरात टायटन्स2 वेळा – लखनऊ सुपर जायंट्स
उरलेल्या 3 जागांसाठी 7 संघांमध्ये घमासान
आयपीएल 2026 मध्ये आता उरलेल्या तीन प्लेऑफ जागांसाठी तब्बल सात संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. पंजाब किंग्सच्या आशा जवळपास संपल्या आहेत. दिल्लीने उरलेला सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त 14 गुण होतील. दुसरीकडे पंजाब किंग्सने लखनऊविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला, तर ते 15 गुणांपर्यंत पोहोचतील, मात्र त्यांचे भवितव्य इतर संघांच्या निकालांवर अवलंबून असेल. तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडे अजूनही 16 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
हे ही वाचा -
