IND vs WI 2nd Test Match : पोर्ट ऑफ स्पेन येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 100 वा कसोटी सामना सुरु आहे. भारताने पहिल्या डावात ४३८ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये विराट कोहलीने शतकी खेळी केली, हे त्याचे कसोटीतील २९ वे तर ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक होय. विराट कोहलीसाठी हे शतक खास ठरले, कारण आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने शतक झळकावले, असा करणारा त हिलाच खेळाडू ठरलाय.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या खेळाडूच्या आईने विराट कोहलीची भेट घेतली. यावेळी तिचे अश्रू अनावर आले... विराट कोहलीची गळाभेट घेतली अन् डोळ्यात अश्रू आले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.


 वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) याची आई फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठी मैदानात येत आहे. जोशुआने विराटला म्हटले होते की,  त्याची इच्छा आहे की, त्याने शतक करावे.  त्याची आई फक्त विराटला पाहण्यासाठीच स्टेडिअममध्ये येत आहे. आता जोशुआच्या आईचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डा सिल्वाच्या आईने विराट कोहलीची भेट घेतली. यावेळी विराटला भेटताच त्या खूपच भावूक झाल्या. विराट कोहलीची गळभेट घेतली, प्रेमानं गालावर चुंबनही घेतलं अन् माऊलीच्या डोळ्यातून अश्रू आले. विरोधी संघाचा खेळाडू असो किंवा त्याचे कुटुंब, प्रत्येकजण विराटचा चाहता आहे. हीच गोष्ट विराटला महान खेळाडू बनवते. जोशुआच्या आईने म्हणाली की, ही खूप मोठी गोष्ट आहे की, विराट त्यांच्या देशात येऊन क्रिकेट खेळत आहे.


विराटला भेटण्यासाठी स्टेडिअममध्ये आलेली जोशुआ डा सिल्वाच्या आईने त्याची गळाभेट घेतली. त्यानंतर त्यांनी विराटचे चुंबनही घेतले. त्यांनी विराटच्या शानदार फलंदाजीसाठी त्याचे अभिनंदनही केले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. विराटशी भेटल्यानंतर जोशुआच्या आईने म्हटले की, त्या आणि त्यांचा मुलगा जोशुआ विराटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांच्यासाठी हा क्षण खूपच खास राहिला. 










 


भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरोधात दमदार शतकी खेळी केली. या शतकासह विराट कोहलीने खास विक्रमाला गवसणी घातली. आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आणि एकमेव खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, धोनी, रिकी पाँटिंग, संगाकारा यांनाही हा पराक्रम करता आला नाही. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरोधात शतक झळकावत अनेक विक्रम केले आहेत. विराट कोहलीचे कसोटीतील २९ वे आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातील ७६ वे शतक होते.