एक्स्प्लोर

वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट

मी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी खूप विचार केला आहे, चिंतन-मनन करुन मी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट विश्वात अनेकदा कमी वयात सुरुवात होते, तर काहीवेळा वयाच्या 25 नंतर खऱ्या अर्थाने करिअरला ग्रोथ मिळायला लागते. त्यामुळे, वयाच्या तिशीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर शक्यतो पस्तीसीनंतरच क्रिकेटर्स निवृत्तीचा विचार करतात. आपल्या कारकि‍र्दीत एखादा वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन ट्रॉफी आपल्या संघाला, देशाला जिंकून देऊनच निवृत्ती घ्यावी असेही अनेकांचे स्वप्न असते. मात्र, वयाच्या 29 व्या वर्षी एखाद्या नामवंत आणि धडाकेबाज क्रिकेटर्संने (Cricket) निवृत्ती घोषित केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना काहीसं दु:ख होतं. वेस्ट इंडिजचा (West indies) स्फोटक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने मंगळवारी 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला. वयाच्या केवळ 29 व्या वर्षीच निकोलसने निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निकोलसने एक भावूक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. 

मी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी खूप विचार केला आहे, चिंतन-मनन करुन मी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. हा खेळ ज्यावर आपण खूप प्रेम करतो, ज्याने आम्हाला खूप आनंद दिलाय आणि यापुढेही देत राहिल. कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी, वेस्ट इंडिज देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. मरुन रंगाचा ड्रेस परिधान करुन राष्ट्रगानसाठी उभे राहणे. तसेच, प्रत्येकवेळी मैदानावर उतरल्यानंतर खेळासाठी, आपल्या देशासाठी आपलं 100 टक्के योगदान देणे. माझ्यासाठी हा अनुभव काय आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणे माझ्यासाठी कायमस्वरुपी सर्वात मोठा सन्मान राहिला आहे. 

वेस्ट इंडिजसाठी माझं प्रेम कायम

पूरनने आपल्या चाहत्यांसाठीही खास संदेश आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे. आपल्या अतूट प्रेमासाठी धन्यवाद, कठिण प्रसंगी तुम्ही मला साथ दिली आणि चांगल्या प्रसंगी माझ्यासह खेळाचा आनंद साजरा केल्याचे पूरनने म्हटले. तसेच, आपले कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसाठी देखील शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रवासात माझ्यासोबत चालण्यासाठी आपले धन्यवाद. आपल्या विश्वास आणि पाठिंब्यानेच मला पुढे जाता आलं. आता, माझ्या करिअरचा हा आंतरराष्ट्रीय अध्याय आता समाप्त होत आहे. पण, वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. संघाच्या यशाव्यतिरिक्त मला काहीही नकोय, असेही निकोलसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

निकोलसचं क्रिकेट करिअर

निकोलस पूरनने 2016 पासून क्रिकेट करिअरला सुरुवात केली. टी-20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर, तीन वर्षांनी 2019 मध्ये वन डे सामन्यात त्याने पदार्पण केलं. वेस्ट इंडिजसाठी त्याने कधीही कसोटी क्रिकेट खेळलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये पूरनने 61 वन डे, 106 टी-20 सामने खेळले असून अनुक्रमे 1983 आणि 2275 धावा बनवल्या आहेत. त्यामध्ये, 3 शतक आणि 11 अर्धशतकाचा समावेश आहे. टी-20 मध्ये 13 अर्धशतक पूरनने झळकावले आहेत. 19 डिसेंबर 2024 चा टी-20 सामना हा पूरनच्या क्रिकेट करिअरमधील शेवटचा सामना राहिला आहे. 

हेही वाचा

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, जयंत पाटील म्हणाले, मला पदमुक्त करा; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती
भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget