IND vs SA: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आशिया चषकानंतर विराट सातत्यानं संघासाठी धावा काढताना दिसतोय. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीच्या (Guwahati) बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विराटनं संघासाठी अर्धशतकाचा त्याग केला. या सामन्यात सामन्यात विराटकडं आणखी एक अर्धशतक करण्याची संधी होती. परंतु, स्ट्राईक दिनेश कार्तिकडं (Dinesh Karthik) होता. त्यावेळी विराटनं कार्तिकला स्ट्राईक मागण्याऐवजी मोठे फटके खेळण्यास सांगितलं. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताच्या डावातील 20 व्या षटकात विराटकडं त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 34वं अर्धशतक झळकावण्याची संधी होती. त्यावेळी दिनेश कार्तिक स्ट्राईकवर होता. तर, दक्षिण आफ्रिकेसाठी कगिसो रबाडानं अखेरचं षटक टाकलं. या षटकातील पहिला चेंडू हुकल्यानंतर कार्तिकनं पुढच्या तीन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर कार्तिकनं विराट कोहलीकडं धाव घेत त्याला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यास सांगितलं. पण त्यावेळी संघाच्या हिताचा निर्णय घेत कोहलीनं कार्तिकला मोठे फटके खेळायला सांगितले. कार्तिकच्या दमदार फलंदाजीमुळं भारतानं शेवटच्या षटकात 18 धावा केल्या. विराटचा दिनेश कार्तिकसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना. दिग्गज क्रिकेटपटूंपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वजण विराटच्या या निर्णयाचं कौतुक करताना दिसत आहेत.
व्हिडिओ-
भारताचा मालिकेवर कब्जा
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या केएल राहुल, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक आणि कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांच विशाल लक्ष्य ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरनं ( नाबाद 106 धावा) शतक आणि क्विंटन डी कॉकनं ( नाबाद 69) अर्धशतक झळकावलं. पण त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात तीन विकेट्स गमावून 221 धावा केल्या. या विजयासह भारतानं तीन सामन्याची टी-20 मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.
हे देखील वाचा-