Wasim Akram : सध्या क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीचं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान पराग आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली यांना भेटण्यासाठी तरुण मैदानात घुसले होते. दरम्यान, मैदानात चाहते अशा प्रकारे घुसलेल्यानंतर सामना पूर्णपणे थांबतो आणि सर्व खेळाडू डिस्टर्ब होतात. या तरुणांना बाहेर काढण्यातही बराच वेळ जातो. मात्र, पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम आक्रमने सांगितलेला जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वसीम आक्रम लॉर्डच्या मैदानावर खेळत असताना एक नग्न तरुणी धावत त्याच्याकडे येत होती. त्यावेळी हा सामना त्या तरुणीमुळे थांबला होता. त्यानंतर स्टेडियममधील मॅनेजमेंटने त्या तरुणीला कपड्यांनी झाकले आणि बाहेर नेले होते. वसीम आक्रम यांनी हा किस्सा कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये सांगितला होता. त्यावेळी सर्व प्रेक्षकांमध्ये हशाही पिकला होता.
वसीम आक्रमने सांगितलेला संपूर्ण किस्सा
वसीम आक्रम म्हणाला होता की, मी बॅचलर होतो. लॉर्ड्सच्या मैदानावर एक तरुणी आली. दुरुन पाहिल्यानंतर तर फार सुंदर दिसत होती. विना कपड्यांचं ती पळत येत होती. जवळ येतच होती की, तोवर व्यवस्थापनाने तिला पकडलं. मी त्यांना म्हणालो तिला जवळ तरी येऊद्या..असंही आक्रम विनोदाने म्हणला. यावेळी कपिलच्या शोमध्ये हशा पिकला होता.
वसीम आक्रमची डोळे दिपवणारी कारकिर्द
वसीम अक्रमने 2003 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या वसीमने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 900 हून अधिक विकेट घेतल्या. वसीम अक्रमच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये 414 विकेट्स आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 502 फलंदाजांना त्याने तंबूत धाडले होते. इतकंच नाही तर वसीम अक्रमने फलंदाजीतूनही आपली धमक दाखवली होती. त्याने 3 शतक तर 7 अर्धशतक झळकावली आहेत. तर वसीम अक्रमच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 6 अर्धशतकांची नोंद आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
