Virat Kohli Retires Test : 'विराटची इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी झाली होती, 4-5 शतक झळकवायचे होते...' निवृत्तीच्या निर्णयाने कोच देखील हैराण
Virat Kohli Retires From Test : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Virat Kohli Retires From Test : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला निरोप दिला, त्यानंतर पाच दिवसांनी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला निरोप दिला. दरम्यान, दिल्ली रणजी संघाचे प्रशिक्षक सरनजीत सिंग यांनी विराट कोहलीबद्दल असा काही मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे कोहली आधीच निवृत्तीच्या मूडमध्ये होता असे अजिबात वाटत नाही.
बीजीटी पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी खेळले देशांतर्गत क्रिकेट
2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या 3-1 अशा पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. त्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि सर्वांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. त्यानंतर विराट कोहली दिल्ली रणजी संघाकडून खेळला आणि रोहित शर्मा मुंबई रणजी संघाकडून खेळला.
दिल्लीच्या कोचने केला आश्चर्यकारक खुलासा
त्यावेळी दिल्ली रणजी संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी विराट कोहलीशी बोलले आणि त्याच वेळी त्यांनी इंग्लंड दौऱ्याबद्दल कोहलीशी बोलले. त्यावेळी कोहलीने सरनदीप सिंगला सांगितले होते की, त्याला 2018 च्या इंग्लंड दौऱ्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुन्हा एकदा 4-5 शतके झळकावायची आहेत.
"कोहली इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता पण..."
विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे आश्चर्यचकित झालेले सरनदीप सिंग म्हणाले की, 'या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा विराट कोहली रणजी सामना खेळण्यासाठी आला, तेव्हा त्याचा इंग्लंड दौऱ्याचा आराखडा तयार होता. मी त्याच्याशी याबद्दल बोललो. मी त्याला विचारले की तो भारत-इंग्लंड मालिकेची तयारी करण्यासाठी काउंटी क्रिकेट खेळणार आहे का? यावर तो म्हणाला होता की मी इंग्लंडमध्ये भारत अ संघाचे 2 सामने खेळेन. मला 2018 मध्ये केल्याप्रमाणे इंग्लंड कसोटी मालिकेत 4-5 शतके करायची आहेत.
Watch clearly this interview of Sarandeep Singh Delhi Ranji Coach
— Abhi (@79off201) May 12, 2025
Virat kohli wanted to play England Series pic.twitter.com/9qpZtSqLvu
कोहलीने कसोटी क्रिकेटला दिला निरोप...
सरनदीप सिंगचे हे ऐकून असे वाटते की विराट कोहलीला इंग्लंड कसोटी मालिकेत 2018 ची कामगिरी पुन्हा करायची होती. पण कदाचित त्याच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते आणि त्याने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. आता विराट कोहली फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
पहिली कसोटी: 20 जून -24 जून, हेडिंग्ले
दुसरी कसोटी: 2 जुलै-6 जुलै, एजबॅस्टन
तिसरी कसोटी: 10 जुलै-14 जुलै, लॉर्ड्स
चौथी कसोटी: 23 जुलै -27 जुलै, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड
पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट, ओव्हल




















