S Badrinath Pick his Best Playing XI IPL 2026 : आयपीएल 2026 चा लीग टप्पा आता संपला असून आजपासून प्लेऑफच्या थराराला सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामात 70 सामने खेळवण्यात आले, त्यापैकी एक सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. संपूर्ण लीग फेरीत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या आधारावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज एस. बद्रीनाथ यांनी आपली आवडती प्लेइंग-12 निवडली आहे. मात्र या संघात स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा याला स्थान न दिल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

सलामीसाठी युवा आणि अनुभवाचा मेळ

ओपनिंगसाठी बद्रीनाथ यांनी युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने तब्बल 232 च्या स्ट्राइक रेटने 583 धावा केल्या. दुसरीकडे शुभमन गिल सातत्यपूर्ण कामगिरी करत 616 धावांपर्यंत पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी बद्रीनाथ यांनी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या साई सुदर्शन याची निवड केली.

Continues below advertisement

मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाज

मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर हेनरिक क्लासेन याला स्थान देण्यात आले आहे. क्लासेनने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक सामन्यांचे चित्र बदलले. पाचव्या क्रमांकासाठी रजत पाटीदारची निवड करण्यात आली. आरसीबीचा कर्णधार म्हणून पाटीदारने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले.

फिरकी गोलंदाजीत जबरदस्त संतुलन

ऑलराउंडर विभागात बद्रीनाथ यांनी तीन धोकादायक खेळाडूंना स्थान दिले आहे. यात कृणाल पांड्या, सुनील नरेन आणि राशिद खान यांचा समावेश आहे. राशिद खान यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंमध्ये राहिला. तर कृणाल पांड्या आणि नरेन यांनी आपल्या किफायतशीर गोलंदाजीने सतत दबाव निर्माण केला.

वेगवान गोलंदाजीत अनुभव आणि स्पीडचा तडका

पेस अटॅकसाठी बद्रीनाथ यांनी भुवनेश्वर कुमार, जोफ्रा आर्चर आणि कागिसो रबाडा यांची निवड केली आहे. भुवनेश्वर कुमार सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर आर्चर आणि रबाडा यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना सतत अडचणीत टाकले. चौथ्या वेगवान गोलंदाजासाठी बद्रीनाथ प्रिन्स यादव आणि कार्तिक त्यागी यांच्यात अंतिम निर्णय घेऊ शकले नाहीत.

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अकील हुसेन

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अकेल होसेन याची निवड करण्यात आली आहे. त्याने 7 सामन्यांत 8 विकेट घेत प्रभावी कामगिरी केली असून त्याची इकॉनॉमीही सुमारे 8 राहिली आहे.

एस बद्रीनाथ यांची निवडलेली प्लेऑफ टीम

वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल, साई सुदर्शन, हेनरिक क्लासेन, रजत पाटीदार, कृणाल पांड्या, सुनील नरेन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, जोफ्रा आर्चर, कागिसो रबाडा, प्रिन्स यादव / कार्तिक त्यागी

इम्पॅक्ट प्लेयर : अकेल होसेन

हे ही वाचा -

Hardik Pandya CSK IPL 2027 : 07:07... हार्दिक पांड्या IPL 2027 मध्ये चेन्नईकडून खेळणार? मुंबईला रामराम ठोकण्याचे दिले संकेत, नेमकं काय घडलं?