Virat Kohli Meet Vaibhav Sooryavanshi RCB vs GT IPL 2026: आयपीएल 2026 च्या स्पर्धेत (IPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपला धडाका कायम राखताना काल आयपीएलचे विजेतेपद पटकावले. बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद उंचावले. गुजरातला 20 षटकांत 8 बाद 155 धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने 18 षटकांत 5 बाद 161 धावा केल्या आणि पुन्हा एकदा आयपीएलचं जेतेपद जिंकले. (RCB vs GT IPL 2026)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 विकेट्स राखून पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीच्या ऐतिहासिक विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने लाखो क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सामन्यानंतर, आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या या हंगामातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारा राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याच्याशी बोलताना आणि त्याला काही सल्ला देताना दिसला. (Virat Kohli Meet Vaibhav Sooryavanshi)

विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशीची भेट, मैदानात काय घडलं? (Virat Kohli Meet Vaibhav Sooryavanshi)

वैभव सूर्यवंशी देखील आरसीबी आणि गुजरातचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होता. सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरणाच्या अगदी आधी, विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील एक सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झालं. जेव्हा समोर विराट कोहली आला तेव्हा वैभव सूर्यवंशीने हात जोडून नमस्कार केला. यानंतर विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीच्या पाठीवर थाप मारून त्याचे अभिनंदन केले. तसेच विराट कोहली वैभवला काही खास टिप्स देताना दिसला. विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशीच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

वैभव सूर्यवंशीने 5 पुरस्कार जिंकून इतिहास रचला- (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

क्वालिफायर 2 मध्ये पराभूत होऊन राजस्थान रॉयल्स संघ स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी हा हंगाम चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याने या आयपीएल हंगामात जगातील आघाडीच्या गोलंदाजांना पराभूत करून आणि एकहाती हंगामातील पाच सर्वात मोठे पुरस्कार जिंकून इतिहास रचला.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये पुढील 5 पुरस्कार जिंकले- (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

  • ऑरेंज कॅप: 776 धावांसह हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP): संपूर्ण हंगामातील सर्वात मौल्यवान आणि सर्वोत्तम खेळाडू.
  • सीझनचा उदयोन्मुख खेळाडू: वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू.
  • सीझनचा सुपर स्ट्रायकर: संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक स्ट्राईक रेट.
  • सीझनचे सुपर सिक्सर्स: एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज.

वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेत इंडिया 'ए' संघाकडून खेळणार- (Vaibhav Sooryavanshi Team India)

वैभवने आयपीएलच्या या हंगामात 15 सामन्यांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राईक रेटने एकूण 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कामगिरीनंतर, त्याला भारतीय टी-20 संघात तात्काळ समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. आयपीएल 2026 संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी विश्रांती घेणार नाही. वैभव लवकरच भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरेल. 9 जून 2026 रोजी श्रीलंकेत सुरू होणाऱ्या इंडिया 'ए', श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय तिरंगी मालिकेत वैभव इंडिया 'ए' संघाकडून खेळणार आहे.

संबंधित बातमी:

ASIAN GAMES 2026: सूर्यकुमार यादव, शुभमन गिल OUT, वैभव सूर्यवंशी IN; आशियाई स्पर्धेसाठी BCCI मोठी घोषणा